Mapusa Theft: मंदिर फोडले, फंडपेटी पळवली अन् हाती आलेली रक्कम अर्ध्यावर टाकून चोरांनी काढला पळ..

Shri Ravlath temple robbery: चोरांना ही फंडपेटी फोडता आली नाही आणि मंदिरापासून काही अंतरावर नदीच्या पुलावर हीच फंडपेटी आढळली
Temple Theft Goa
Temple Theft GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Temple theft in Goa

म्हापसा: गोव्यात सध्या चोरीच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. म्हापशातील मयडे येथील श्री रवळनाथ देवस्थान फोडून चोरांनी फंडपेटी चोरली, काही कारणास्तव चोरांना ही फंडपेटी फोडता आली नाही आणि मंदिरापासून काही अंतरावर नदीच्या पुलावर हीच फंडपेटी आढळली.

गुरुवार (दि. १६ जानेवारी) एक शाळकरी मुलगा दरदिवशी प्रमाणे मंदिरात फुलं वाहायला आला होता आणि दरम्यान दरवाजा उघडून बघताच एकूण प्रकार त्याच्या लक्षात आला. मंदिरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्याने थेट घरी पालकांना याबद्दल माहिती दिली. मुलाचे पालक मंदिरात दाखल होताच त्यांनी तोडलेलं कुलूप पाहिलं, मंदिराची फंडपेटी देखील गायब झाली होती. चोरांनी या मंदिराचे कुलूप फोडण्यासाठी वापरलेली सळी मात्र तिथेच पडून होती.

कुलूप तुटल्याचे पाहून सर्वानी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना नदीच्या काठी पायऱ्यांवर फंडपेटी आढळून आली. चोरांना ही फंडपेटी फोडण्यात यश न आल्याने आतली रक्कम सुरक्षित राहिली. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Temple Theft Goa
Goa Gold Theft Case: सोने चोरीप्रकरणाला कलाटणी, अटकपूर्व जामिनासाठी कॅसिनो चालकाची कोर्टात धाव; वाचा नेमंक प्रकरण?

म्हापसा पोलीस उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर, सहाय्यक उपनिरीक्षक अजय गावकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाचा पंचनामा केला. आज सकाळी पहाटेच्या सुमारास एक स्थानिक मंदिराकडून निघाला असता त्याने परिस्थिती आलबेल असल्याची माहिती दिली, त्यामुळे ही घटना त्यानंतर म्हणजेच ३ वाजता किंवा त्यांनतर घडली असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिराकडून ही फंडपेटी रिकामी करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com