Mapusa Theft: चैनीसाठी मुलाने चोरले चार लाख रुपये, आईने दिली पोलिसात तक्रार; वाचा नेमके काय घडले..

Mapusa Crime News: मौजमजेसाठी आपल्याच आईचे ४ लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार म्हापसा शहरात उघडकीस आला. याप्रकरणी फिर्यादी आई यांच्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी संशयित प्रियेश वायंगणकर (३९) याला अटक केली.

Mhapsa Theft Canva
Published on
Updated on

Mother Lodges Complaint Against Son for Theft in Mapusa

म्हापसा: मौजमजेसाठी आपल्याच आईचे ४ लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार म्हापसा शहरात उघडकीस आला. याप्रकरणी फिर्यादी आई प्रिया पुंडलिक वायंगणकर (रा. खोर्ली) यांच्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी संशयित प्रियेश पुंडलिक वायंगणकर (३९) याला अटक केली. संशयित व फिर्यादी एकाच घरात राहतात.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ही चोरीची घटना दि. २५ ऑक्‍टोबर रोजी दुपारी घडली होती. आईने घरातील कपाटामध्ये ४ लाख रुपये रोख ठेवले होते. हे पैसे आपल्या मौजमजेसाठी हवे असल्याने मुलाने त्‍या पैशांवर डल्ला मारला.

हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच, तिने म्हापसा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, या चोरीमागे संशयित मुलगाच असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित प्रियेशला अटक केली. पोलिसांनी संशयितांकडून ७० हजार रुपये हस्तगत केले आहेत.

Mapusa Crime News: मौजमजेसाठी आपल्याच आईचे ४ लाख रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार म्हापसा शहरात उघडकीस आला. याप्रकरणी फिर्यादी आई यांच्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी संशयित प्रियेश वायंगणकर (३९) याला अटक केली.
Saligao Theft: घरमालकाच्या मोबाईलवरून 'ऑनलाईन' चोरी! गोव्यातील अजब प्रकार; संशयिताच्या कर्नाटकमध्ये आवळल्या मुसक्या

म्हापसा न्यायालयाने संशयित मुलाला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com