

म्हापसा: रस्त्यावर मध्येच कार थांबविण्याच्या शुल्लक कारणावरून आयआरबी पोलीस कॉन्स्टेबलला जाब विचारत त्याच्या गाडीची चावी काढून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या दोड्डाहसन (कर्नाटक) येथील पाच पर्यटकांना म्हापसा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईखाली अटक केली.
ही घटना, म्हापसा शहरातील मारूती मंदिरासमोरील रस्त्यावर ९ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली. म्हापसा वाहतूक पोलीस स्थानकाशी संलग्न असलेला कॉनी मास्कारेन्हस हा आयआरबी पोलिस कॉन्स्टेबल पोलिस स्थानकावरून आपली कार घेऊन कोलवाळ येथे नियुक्त सेवास्थळी जात होता.
अटक केलेल्यांमध्ये अनिल राजन गौडा (३३), मनू रंगे गौडा (३०), नवीन स्वामी गौडा , सागर रंगे गौडा (२५) व अविनाश स्वामी गौडा (२८) सर्व दोड्डा, हसन-कर्नाटक यांचा समावेश आहे.
घटनेवेळी हुतात्मा चौक येथे वाहतूक कोंडी होती. त्यामुळे मास्कारेन्हस यांनी आपली कार घटनास्थळी थांबवली. या कारच्या मागून संशयित पर्यटक हे आपल्या कारने येत होते. कार मध्येच उभी केल्याच्या कारणावरून पाचही संशयित हे आपल्या गाडीतून बाहेर आले.
त्यांनी आयआरबी पोलीस कॉन्स्टेबल मास्कारेन्हस याच्या कारच्या काचावर हात मारत त्यांना जाब विचारला. तसेच कारची चावी हिसकावून घेत आपली कार मागे घेऊन तिथून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमलेला जमाव पोलिसाच्या मदतीला धावून आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.