River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Mapusa River Water Quality Report: म्हापसा-पणजी महामार्गावरील कल्व्हर्टजवळ म्हापसा नदीच्या पाण्याची गुणवत्ता चिंताजनक असल्याचे मासिक तपासणी अहवालातून समोर आले आहे.
Mapusa River Water Quality Report
River PollutionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: म्हापसा-पणजी महामार्गावरील कल्व्हर्टजवळ म्हापसा नदीच्या पाण्याची गुणवत्ता चिंताजनक असल्याचे मासिक तपासणी अहवालातून समोर आले आहे. पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण निर्धारित पातळीपेक्षा कमी, तर जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी (बीओडी) आणि फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नदीपाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

सरकारी यंत्रणेच्या अहवालानुसार, नदीच्या पाण्याचा पीएच ६.२५, टर्बिडिटी २.५८ एनटीयू आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण तीन मिलीग्रॅम प्रतिलिटर नोंदविण्यात आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एसडब्ल्यू-२ वर्गीकरणानुसार, विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण किमान चार मिलीग्रॅम प्रतिलिटर असणे आवश्यक आहे. मात्र, म्हापसा नदीतील हे प्रमाण त्यापेक्षा कमी आहे. तसेच, बीओडीचे प्रमाण ४.८ मिलीग्रॅम प्रतिलिटर नोंदविण्यात आले असून, निर्धारित मर्यादा तीन मिलीग्रॅम प्रतिलिटरपेक्षा कमी आहे.

Mapusa River Water Quality Report
Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

पाण्यातील फिकल कोलिफॉर्मचे प्रमाणही चिंताजनक आहे. अहवालात ते १७०० एमपीएन प्रति १०० मिली नोंदविण्यात आले असून, निर्धारित मर्यादा १०० एमपीएन प्रति १०० मिली आहे. म्हणजेच, या ठिकाणी फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण निर्धारित मर्यादेच्या १७ पट आढळले आहे. विरघळलेल्या ऑक्सिजनची कमतरता आणि बीओडीचे वाढलेले प्रमाण हे पाण्याच्या गुणवत्तेबाबत महत्त्वाचे संकेत मानले जातात; तर फिकल कोलिफॉर्मचे वाढलेले प्रमाण मलजन्य दूषिततेची शक्यता दर्शवते.

दरम्यान, गोव्यातील प्रदूषित नदीक्षेत्रांची संख्या कमी झाल्याचे राज्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१८ मध्ये ११ असलेली ही संख्या २०२२ मध्ये सहा, तर सप्टेंबर २०२५ मध्ये दोनपर्यंत खाली आली. मात्र, असे असले तरी म्हापसा नदीतील या ठिकाणच्या तपासणी निष्कर्षांमुळे स्थानिक पातळीवरील पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Mapusa River Water Quality Report
Goa Politics: गोव्याची माणुसकी हरवतेय? खरगेंच्या ताफ्याला झालेल्या विरोधाने ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ

प्रदूषित नदीक्षेत्र संख्या घटली

२०१८ : ११ प्रदूषित नदीक्षेत्रे

२०२२ : ६ प्रदूषित नदीक्षेत्रे

सप्टें. २०२५ : २ प्रदूषित नदी क्षेत्रे

अहवालानुसार, म्हापसा नदीच्या तपासणीतील निष्कर्ष स्थानिक पातळीवर पाण्याच्या गुणवत्तेचे नियमित निरीक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com