Mapusa Crime: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीला दावणगिरीतून अटक

म्हापसा पोलिसांकडून पोक्सो कायद्यानुसार कारवाई
Mapusa Police
Mapusa Police Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Police: मूळची कर्नाटकातील असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपीस म्हापसा पोलिसांनी कर्नाटकातील दावणगिरीतून अटक केली आहे. पीडीत मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे.

मोहम्मद राजाबल्ली (वय 23 वर्षे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तो सध्या बार्देश येथील बेती येथे वास्तव्यास होता. तो मूळचा बाशानगर, दावणगिरी, कर्नाटक येथील रहिवासी आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mapusa Police
Chlorine Gas Leak At Assonora: सलग दुसऱ्या दिवशी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन गळती

म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांनी ही माहिती दिली. 10 जुलै रोजी एका महिलेने म्हापसातील कदंबा बस स्टँडवरून तिच्या 16 वर्षांच्या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

म्हापसा पोलिसांनी त्यानंतर विविध पथके स्थापन करून मुलीचा शोध घ्यायला सुरवात केली होती. एका संशयित आरोपीने पीडीत मुलीला पळवून नेल्याचे समोर आले होते. त्यांच्या शोधासाठी कर्नाटकातील बेळगाव आणि दावणगिरी येथेही पथकांनी शोध घेतला.

आरोपीच्या हालचालींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आरोपीला दावणगिरी येथून अटक केली. तसेच अल्पवयीन मुलीची सुटका केली. पीडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. POCSO कायद्यानुसार संशयितावर कारवाई करण्यात आली आहे.

Mapusa Police
Mumbai-Margao Vande Bharat: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला जोडणार आणखी 8 डबे

संशयित आरोपी महंमद राजाबल्ली हा सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

तपास पथकात एलपीएसआय ऋचा भोसले, पीएसआय गौरव नाईक, पीएसआय विराज कोरगावकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, पोलिस कॉन्स्टेबल अक्षय पाटील, लेडी पोलिस कॉन्स्टेबल प्राजक्ता झाल्बा यांचा समावेश होता.

पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक शितकांत नायक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com