Narendra Modi: गोव्याच्या श्रुती आणि रोहितने जिंकले PM मोदींचे मन! म्हापसा ITIचे टॉपर्स; नवी दिल्लीतील विज्ञान भवनात गौरव

Mapusa ITI Topper: शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला.
Narendra Modi
Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा आयटीआयचे वेस्ट झोन टॉपर्स श्रुती आगरवाडेकर आणि रोहित पार्सेकर या दोन विद्यार्थ्यांना नवी दिल्लीतील विज्ञान भवनात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कौशल्य दीक्षान्त समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गोव्यातील या विद्यार्थ्यांच्या चमकदार कामगिरीमुळे पंतप्रधान मोदी भारावून गेले.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशिक्षण महासंचालनालयाने जाहीर केलेल्या चौथ्या कौशल्य दीक्षान्त समारोह-२०२५ सोहळ्यामध्ये गोव्यातील म्हापसा सरकारी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना पश्चिम विभागातील टॉपर्स म्हणून घोषित करण्यात आले.

शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला. म्हापसा शासकीय आयटीआय संस्थेत आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रा. सुभाष रेडकर आणि सर्व्हेअर जॉनी परेरा यांच्या हस्ते या अव्वल क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Narendra Modi
Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

या प्रशिक्षणार्थींच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. त्यांना भविष्यातील प्रयत्नांमध्ये यश मिळावे, अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रशिक्षणार्थींच्या यशाबद्दल म्हापसा सरकारी आयटीआय तसेच गोव्यातील संपूर्ण कौशल्य शिक्षण क्षेत्राने अभिनंदन केले आहे.

Narendra Modi
Drone Pilot Course: गोव्याच्या ITI मध्ये यंदापासून ड्रोन पायलट अभ्यासक्रम, रोबोटिक्स कोर्सही लवकरच

वयाच्या नियमामुळे हुकली रिसाची संधी

या यशस्वी प्रशिक्षणार्थींमध्ये रोहित पार्सेकर, रिसा डिसोझा हे दीपक धायमोडे यांचे विद्यार्थी तसेच लीना पोरोब यांची विद्यार्थिनी श्रुती आगरवाडेकर हिने ६०० पैकी ६०० गुण मिळवले. त्यांना रिया हळदणकर यांनीही मार्गदर्शन केले. मात्र, वयानुसार टाय-ब्रेकर नियमांमुळे रिसा ही या समारंभाला उपस्थित राहू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com