Drone Pilot Course: गोव्याच्या ITI मध्ये यंदापासून ड्रोन पायलट अभ्यासक्रम, रोबोटिक्स कोर्सही लवकरच

Goa ITI Drone Pilot Course: आयटीआय साधनसुविधा, उत्तम शिक्षण आणि सर्वांगाने प्रगत असून सातत्याने नव-नवीन अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटीशीप व प्रत्यक्ष ज्ञान यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Goa ITI Drone Pilot Course
Drone course in iti goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील तरुणाईच्या हाताला रोजगार मिळावा, बेरोजगारी कमी व्हावी, युवांच्या कौशल्यात वाढ व्हावी, उद्योजकतेला चालना देत नव-नवीन क्षेत्रात त्यांनी पदार्पण करत स्वयंपूर्ण व्हावे या उद्देशाने सरकार आयआयटींना चालना देत असून काळाची गरज ओळखून यंदा आयटीआयमध्ये ड्रोन पायलट हा नव्याने अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालक एस. एस. गावकर यांनी सांगितले.

गावकर म्हणाले की, ड्रोन पायलट (ज्यूनियर) हा सहा महिन्याचा अभ्यासक्रम आहे. ड्रोनसंबंधी अनेक नवनवीन रोजगाराच्या सध्या उपलब्ध होत असून या अभ्यासक्रमाचा त्यांना निश्‍चितपणाने लाभ होईल.

राज्यातील आयटीआय साधनसुविधा, उत्तम शिक्षण आणि सर्वांगाने प्रगत असून सातत्याने नव-नवीन अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटीशीप व प्रत्यक्ष ज्ञान यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील सरकारी आणि खासगी मिळून एकूण १३ आयटीआय आहेत. यांमध्ये ४४ विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जातात. विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल वाढत असून सरकारही त्या अनुषंगाने योग्य पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

Goa ITI Drone Pilot Course
Goa Education: 9 वी, 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! घ्यावे लागणार तांत्रिक शिक्षणाचे धडे; NEP नुसार परिपत्रक जारी

रोबोटिक्स अभ्यासक्रम

राज्यातील युवकांना तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीशी करार करण्यात आला असून त्यांच्या माध्यमातून येत्या काळात विविध नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आहेत. ज्यात रोबोटिक्सचा देखील समावेश असणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.

Goa ITI Drone Pilot Course
New Education Policy: सर्व शिक्षकांना 2030 पर्यंत प्रशिक्षित करणार, शिक्षण सचिवांनी दिली माहिती; अद्ययावत राहण्याचे केले आवाहन

आदरातिथ्य अभ्यासक्रमाला प्रतिसाद

गेल्यावर्षी आदरातिथ्य क्षेत्रातील एका वर्षाचा अभ्यासक्रम पहिल्यांदाच काही आयटीआयमध्ये सुरू करण्यात आला होता. या अभ्यासक्रमाअंतर्गत सहा महिने शिक्षण आणि आता सहा महिन्यांसाठी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ताज हॉटेल समूहामध्ये अप्रेंटीशीप करत आहेत. त्यांना प्रशिक्षणार्थी मानधनही मिळत असून येत्या काळात त्यांना नोकरीही मिळणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने राज्यातील युवकांना आदरातिथ्य क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देणे हा असल्याचे गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com