आरोपीला 48 तासांत अटक करा; 4 वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी काँग्रेस आक्रमक, म्हापसा पोलिस ठाण्यावर धडक

Mapusa Sexual Assault Case: चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने सोमवारी संध्याकाळी आक्रमक पवित्रा घेत म्हापसा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
Mapusa Sexual Assault Case
Mapusa Sexual Assault CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: येथे चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने सोमवारी संध्याकाळी आक्रमक पवित्रा घेत म्हापसा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रथम घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षकांना वाढत्या गुन्हेगारीवरून आणि पोलिसांच्या ढिसाळ गस्तीवरून धारेवर धरले. संबंधित आरोपीला पुढील ४८ तासांत अटक करावी, अशी मुदत यावेळी काँग्रेस नेत्यांनी पोलिसांना दिली.

Mapusa Sexual Assault Case
Palolem Beach Goa: पाळोळे बीचचा जगभर डंका! जगातील टॉप 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पटकावलं सहावं स्थान; आशियातील ठरला नंबर वन बीच

या निषेध मोर्चात प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतीक्षा खलप, प्रतिमा कुतिन्हो, विजय भिके, अमरनाथ पणजीकर, प्रसाद शिरोडकर, ॲड. शशांक नार्वेकर, वीरेंद्र शिरोडकर, चंदन मांद्रेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. म्हापशात नियमित आणि प्रभावी गस्त घालण्यात पोलिस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. तसेच गस्तीवर तैनात असलेल्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

Mapusa Sexual Assault Case
Britain To Goa Flights: ब्रिटनमधून गोव्यात विमानफेऱ्यांत वाढ, 'टीयूआय'च्या पाच थेट फेऱ्या; 32,000 विमान आसने उपलब्ध

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतीक्षा खलप यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, हे गृहखात्याचे मोठे अपयश आहे. असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी दिवाळीसारख्या दिव्यांच्या उत्सवात गोव्यात लहान मुलीवर लैंगिक अत्याचार होणे ही सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ॲड. शशांक नार्वेकर यांनी म्हापशात गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक राहिलेला नाही. शहरात ३३ हून अधिक बेवारस इमारती आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.