Britain To Goa Flights: ब्रिटनमधून गोव्यात विमानफेऱ्यांत वाढ, 'टीयूआय'च्या पाच थेट फेऱ्या; 32,000 विमान आसने उपलब्ध

TUI flights to Goa 2027: गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा ब्रिटनमधील पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टीयूआय’ने केली आहे.
Britain To Goa Flights
Britain To Goa FlightsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा ब्रिटनमधील पर्यटन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टीयूआय’ने केली आहे. २०२७-२८ च्या हिवाळी पर्यटन हंगामासाठी गोव्याकडे येणाऱ्या विमान प्रवासी क्षमतेत २८ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या वाढीमुळे नोव्हेंबर २०२७ ते मार्च २०२८ या कालावधीत ब्रिटनमधून गोव्यासाठी ३२ हजारांहून अधिक विमान आसने उपलब्ध होणार आहेत.

‘टीयूआय’ एअरवेजच्या माध्यमातून लंडनमधील गॅटविक आणि मँचेस्टर या दोन विमानतळांवरून गोव्यासाठी आठवड्याला पाच थेट विमानफेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

या विस्तारित कार्यक्रमांतर्गत लंडन गॅटविकहून गोव्यासाठी आठवड्याला तीन विमानफेऱ्या असतील. सध्या असलेल्या बुधवार आणि शनिवारच्या सेवांमध्ये रविवारच्या नव्या विमानफेरीची भर पडणार आहे.

Britain To Goa Flights
Palolem Beach Goa: पाळोळे बीचचा जगभर डंका! जगातील टॉप 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पटकावलं सहावं स्थान; आशियातील ठरला नंबर वन बीच

मँचेस्टरहून आठवड्याला दोन विमानफेऱ्या सुरू राहतील. मात्र, मंगळवारच्या विमानफेरीसाठी अधिक प्रवासी क्षमता असलेल्या बोईंग ७८७-९ ड्रीमलायनर या विमानाचा वापर केला जाईल. या पाचही विमानफेऱ्या थेट स्वरूपाच्या असतील. २०२७-२८ च्या हिवाळी हंगामात ब्रिटनमधून गोव्याला थेट विमानसेवा देणारी ‘टीयूआय’ ही एकमेव विमान कंपनी असेल, असे वृत्त आहे.

Britain To Goa Flights
Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

पर्यटन पॅकेजची विक्री सुरू

२०२७-२८ च्या हिवाळी हंगामासाठी ‘टीयूआय’ने गोव्याची पर्यटन पॅकेजीस आतापासूनच विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. उत्तर गोव्यातील कांदोळी येथील द अ‍ॅस्टर गोवा हॉटेलमध्ये सात रात्रींच्या निवासासह विमान प्रवासाचे पॅकेज प्रतिव्यक्ती १,३४४ ब्रिटिश पौंडांपासून उपलब्ध आहे. दक्षिण गोव्यातील बेताळभाटी येथील बेलेझा बाय द बीच हॉटेलमध्ये सात रात्रींच्या निवासाचे पॅकेज प्रतिव्यक्ती १,५६६ पौंडांपासून सुरू होते. या पॅकेजमध्ये विमान प्रवास, निवास आणि विमानतळ ते हॉटेल वाहतूक यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.