Mapusa: फुटपाथवर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, म्हापसा पालिकेचे दुर्लक्ष; बाजारात येणाऱ्यांना होतोय मन:स्‍ताप

Mapusa Market: फुटपाथवरून काही व्यावसायिकांनी बांबूंचा मंडप घालून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू केला आहे.
Mapusa Market
Mapusa MarketDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: म्हापसा येथील कंझ्युमर (म्हापसा बझार) सोसायटीच्या मागच्या बाजूने मरड, म्हापसा येथील सारस्वत बँककडे जाणाऱ्या फुटपाथवरून काही व्यावसायिकांनी बांबूंचा मंडप घालून बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू केला आहे.

याप्रकारास काही नगरसेवक व पालिका मार्केटचे चेअरमन, निरीक्षक जबाबदार असल्याचा आरोप समाजसेवक संजय बर्डे व शिवसेनेचे जितेश कामत यांनी केला आहे.

कामत म्हणाले की, यापूर्वी आशिष शिरोडकर हे म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी म्हापसा पालिका मार्केटमधील रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकावर ताळतंत्र आणण्यासाठी त्यांना तेथून काढून इतरत्र जागी बसविले होते. आता व्यापाऱ्यांनी काही नगरसेवक व पालिका मार्केट चेअरमन व निरीक्षक यांना हाताशी धरून रस्त्याच्या मधोमध बसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळ सर्वसामन्यांना फुटपाथवरुन चालणेही त्रासदायक ठरत आहे.

Mapusa Market
Goa Education: पाच वर्षांत 891 मुलांनी सोडल्या शाळा! 374 किशोरवयीन मुलींचा समावेश; राज्यसभेत मंत्र्यांची माहिती

वीज ट्रान्सफॉर्मरजवळ दुकाने

म्हापसा कंझ्युमर सोसायटीच्या बाजूलाच एक मोठा विजेचा ट्रान्सफॉमर उभारण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी तो काढून ‘अंडरग्राउंड केबलिंग’ करतेवेळी छोटेखांनी विजेचा ट्रान्सफॉमर बसविण्यात आला. त्याठिकाणी आता एक चप्पल, मसाल्याचे दुकान आणि इतर साहित्य विकणाऱ्यांनी कब्जा केला आहे. या दुकांनांमुळे प्रवाशांना त्रास होत आहे. याकडे म्हापसा पालिकेने अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे संजय बर्डे व जितेश कामत यांनी म्हटले आहे.

Mapusa Market
Goa ZP Election: भाजपची तिसरी यादी जाहीर! जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आणखी 9 उमेदवारांची नावे निश्चित; आतापर्यंत 38 जागांवर कमळाचे उमेदवार

पाहणी करून चौकशीचे आदेश

यासंदर्भात, म्हापसा पालीकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, या फुटपाथवर बांबूचा मंडप घातलेला आहे आणि त्याठिकाणी व्यवसाय थाटण्यात आलेला असल्याची माहिती पालिका कर्मचारी किंवा सुपरवायझने दिली नाही.

आपण लगेच पाहणी करून त्याची चौकशी करणार असल्याचे सांगितले. मात्र, आठ दहा दिवस उलटून गेले असले तरी या व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षच्या लक्षात आणूनही प्रश्न सुटन नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com