

पणजी: गेल्या पाच वर्षांत राज्यातील ८९१ मुलांनी शाळा सोडल्या, ज्यात ३७४ किशोरवयीन मुलींचा समावेश असल्याचे केंद्रीय महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून उघड झालेले आहे.
स्थलांतर, बिकट आर्थिक परिस्थिती, बाल वयात येणाऱ्या घरगुती जबाबदाऱ्या आदी कारणे या गळतीस कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती बिकट असलेल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने गोव्यासह सर्वच राज्यांमध्ये समग्र शिक्षा अभियान सुरू केले आहे.
या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, वाहतूक भत्ता पुरवण्यात येत आहे. शिवाय त्यांच्यासाठी हंगामी वस्तीगृहेही उभारण्यात येत आहे, असेही मंत्री ठाकूर यांनी उत्तरात नमूद केले आहे.
शाळा सोडलेली मुले
वर्ष एकूण किशोरवयीन मुली
२०२१–२२ ९८ ३५
२०२२–२३ २५३ १२०
२०२३–२४ १९६ ८८
२०२४–२५ १४८ ५९
२०२५–२६ १९६ ७२
एकूण ८९१ ३७४
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.