Mapusa: म्‍हापसा पालिकेच्‍या कारभाराची चिरफाड! नगरसेवकांनी वाचला मुख्‍यमंत्र्यांसमोर समस्‍यांचा पाढा

Mapusa City Issues: पालिका मंडळ, व्यापारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत मुख्‍यमंत्र्यांनी महत्त्‍वपूर्ण बैठक घेतली. यांनी मुख्याधिकाऱ्यांना कर गोळा करण्याबाबत आवश्यक सूचना केल्या.
Mapusa  municipal council cm pramod sawant
Mapusa municipal council cm pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्‍हापसा शहरातील कचरा व्यवस्थापनाची विस्कटलेली घडी, अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली पूरसदृश स्थिती, रखडलेला मलनि:स्सारण प्रकल्प तसेच प्रभागनिहाय प्रलंबित समस्यांबाबतचा पाढाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासमोर वाचला. पालिका मंडळ, व्यापारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत मुख्‍यमंत्र्यांनी महत्त्‍वपूर्ण बैठक घेतली. यावेळी त्‍यांनी मुख्याधिकाऱ्यांना कर गोळा करण्याबाबत आवश्यक सूचना केल्या.

यासंदर्भात बोलताना नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर यांनी माध्यमांसमोर सांगितले की, शहरातील कचरा व्यवस्थापनाचा विषय असो किंवा अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेली पूरसदृश स्थिती असो, याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुळात हे विषय पालिका मंडळाच्या चुकीच्या व सुस्त प्रक्रियेमुळे निर्माण झाले आहेत.

कारण, गटार उपसा किंवा नाल्यांची साफसफाई ही पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होती. परंतु, ही कामे वेळेत मार्गी लागली नाही. याचे मुख्य कारण सत्ताधारी पक्षात नगराध्यक्षपदासाठी सुरू असलेली स्‍पर्धा होय. मुख्यमंत्र्यांनी शहरातील कचरा व्यवस्थापनाचे सूत्र हाताळण्याबाबत गोवा कचरा प्राधिकरणाला आवश्यक सूचना केल्या असल्‍याची माहिती नगरसेवक नार्वेकर यांनी दिली.

Mapusa  municipal council cm pramod sawant
Mapusa: म्हापशातील प्रशासकीय इमारतीला गळतीचे ग्रहण! इलेक्ट्रिक बोर्डमध्ये पाणी जाऊन शॉक लागण्याच्या घटना, संगणकावरील कामे ठप्प

त्याचप्रमाणे शहरात जे नाले बांधले आहेत, त्यांची रचना सदोष आहे. काँक्रीटीकरणामुळे सपाटीकरण केल्याने पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होतोय, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. नगरसेवकांच्या कैफियती ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसमवेत बंद दाराआड चर्चा करत आवश्यक सूचना करतानाच निर्देशही दिले. यावेळी स्थानिक आमदार तथा उपसभापती ज्‍योशुआ डिसोझा, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट उपस्‍थित होते.

Mapusa  municipal council cm pramod sawant
Mapusa: अखेर म्हापशातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई, छतावरील पत्रे कोसळायचे बाजारपेठेत; पालिकेकडून दखल

म्‍हापसा शहरातील कचऱ्याची समस्‍या मार्गी लावण्यासाठी तात्पुरती ही जबाबदारी गोवा कचरा प्राधिकरणाकडे दिली आहे. अवकाळी पावसामुळे शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यासाठी केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही. कारण काहींनी गटार आणि नाल्यांवर बांधकामे केली आहेत. त्‍यास पालिकाही तितकीच जबाबदार आहे. पालिकेकडून वेळीच हस्तक्षेप न झाल्याने त्यात वाढ झाली आहे, असे मुख्यमंत्री म्‍हणाले. संबंधित अभियंत्यांना ग्राऊंडवर उतरून कामे करण्यास निर्देश दिले आहेत, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com