साखळीचा आठवडी बाजार
साखळीचा आठवडी बाजार Dainik Gomantak

साखळीचा आठवडी बाजार आता दोन दिवस !

नगराध्यक्षांकडून सहकार्याचे आवाहन: रविवार, सोमवार भरणार; व्यापाऱ्यांमध्ये समाधान
Published on

साखळीतील आठवडी बाजार आता रविवार आणि सोमवार असे दोन दिवस भरणार आहे. येत्या ३ सप्टेंबरपासून या घोषणेची अंमलबजावणी होणार आहे,असे नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले. याबाबत नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व इतर नगरसेवकांनी बाजारात फिरून व्यापाऱ्यांना आवाहन केले.

साखळीचा आठवडी बाजार
तियात्रांचा दर्जा सुधारला, पण सन्मान दूरच!

पालिकेच्या या निर्णयामुळे साखळी बाजारातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर या उपक्रमामुळे साखळीच्या बाजाराला पुनर्वैभव प्राप्त होईल, असा विश्वास नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी व्यक्त केला.

साखळी बाजार दिवसेंदिवस ओस पडत असल्याने या बाजारातील व्यापाऱ्यांनी काळजी व्यक्त केली होती. साखळी शहराचा होत असलेला विस्तार व ठिकठिकाणी उभ्या होत असलेल्या व्यावसायिक इमारती, यामुळे बाजारात मिळणाऱ्या सर्व वस्तू आज बाजाराबाहेर उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे लोकांनी या बाजाराकडे जवळजवळ पाठच फिरवल्याचे दिसून येत आहे. या बाजाराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी साखळी पालिका मंडळाने काही नियोजन केले आहे. त्यातील एक आठवडी बाजार दोन दिवस भरवणे हा आहे.

बाजारात नगराध्यक्षा रश्मी देसाई यांच्यासह उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, नगरसेविका दीपा जल्मी, निकिता नाईक, बाजार निरीक्षक बसप्पा व इतरांनी फिरून व्यापाऱ्यांना पालिकेच्या निर्णयाची माहिती दिली.

साखळीचा आठवडी बाजार
Goa Traffic Rule: गोमन्तक’तर्फे मुलांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन

या सर्वांनी बाजारात फिरून सर्व व्यापाऱ्यांना रविवारपासून दोन दिवस बाजारसाठी येण्याची विनंती केली. सर्व व्यापाऱ्यांनीही सदर विनंती मान्य करून दोन दिवस बाजाराला बसण्याची तयारी दाखवली आहे.

साखळी बाजारातील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात लाभ व्हावा व या बाजाराला पूर्वीप्रमाणे दिवस यावेत, यासाठी दोन दिवस आठवडा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी केले.

या बाजाराला चांगले दिवस यावेत यासाठी दोन दिवस बाजार करणे योग्य आहे. पण रविवारी बाजाराला बसणाऱ्या विक्रेत्यालाच सोमवारी बसायला द्यावे, अशी कडक पावले पालिकेला उचलावी लागतील, अशी प्रतिक्रिया एक फुलविक्रेते राजेंद्र नाईक यांनी व्यक्त केली. तर या दोन दिवसांच्या साप्ताहिक बाजारामुळे बाजारातील इतरही व्यापाऱ्यांना लाभ होणार आहे, असेही बाजारातील व्यापाऱ्यांनी म्हटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com