Goa Traffic Rule: गोमन्तक’तर्फे मुलांना रस्ता सुरक्षा मार्गदर्शन

‘बालभारती’च्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन: वाहन हाकतानाच्या दक्षतेची दिली माहिती
Goa Traffic Rule
Goa Traffic RuleDainik Gomantak
Published on
Updated on

‘गोमन्तक’ आणि बालभारती विद्यामंदिर रायबंदर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘गोमन्तक’तर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. वाहन चालविताना कोणती खबरदारी घ्यावी, कोणते नियम पाळावेत, काळजी कोणती घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी. वाहनासंबंधी त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Goa Traffic Rule
Mega Block: कुमठा-कुंदापूर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

या कार्यक्रमास सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम शेट मांद्रेकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अप्लोनिया फर्नांडिस, वरिष्ठ शिक्षक उदय गावकर, गोमन्तकचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरूण पाटील, सहाय्यक वितरण व्यवस्थापक भारत पोवार व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते. पावर पॉईंटच्या सहाय्याने त्यांनी मुलांना चलचित्रांद्वारे व मोजक्याच शब्दात वाहतूकीचे नियम समजावून सांगितले. काही मुलांना व्यासापीठावर बोलावून प्रात्यक्षिकही केले.

रस्ता ओलांडताना मुलांनी घ्यावी, वाहन चालविण्याचा परवाना कधी व त्याचे नियम काय, वाहतूक सिग्नलमधील रंगांचे महत्त्व व उपयोजन सांगितले. एखाद्या अपघातावेळी तिथे आपण कशी मदत केली पाहिजे, याबाबत विस्तृत माहिती दिली. वाहन कायद्याच्या विविध नियमांची माहिती मुलांना करून दिली.

‘गोमन्तक’चे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अरूण पाटील यांनी ‘गोमन्तक’च्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ‘गोमन्तक’च्या उपक्रमात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Goa Traffic Rule
तियात्रांचा दर्जा सुधारला, पण सन्मान दूरच!

प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन ‘गोमन्तक’चे सहाय्यक वितरण व्यवस्थापक भारत पोवार यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन वरिष्ठ शिक्षक उदय गावकर यांनी केले तसेच शिक्षक कृष्णा मळेवाडकर यांनी आभार मानले.

उत्तम उपक्रम

वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मुले ही उद्याचे सुजाण नागरिक असतात. त्यामुळे विद्यार्थ्य़ांना याबाबत प्रशिक्षित केल्यास उद्याचे युवक किंवा उद्याचे नागरिक रस्त्यांवर वाहन चालवताना घ्यावयाच्या काळजीबाबत जागरूक होतील. त्यामुळेच दै. गोमन्तकने सुरू केलेला हा जागृतीचा उपक्रम महत्त्वाचा आहे,असे यावेळी उपस्थित शिक्षकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com