Maan Ki Baat ‘मन की बात’ हा कार्यक्रम एकतर्फी संभाषण नसून, ती लोकसहभागातून ‘स्वयं से समष्टी’ चळवळ बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मधून देशवासीयांसोबत संवाद साधतात. या कार्यक्रमाचा 100 वा भाग आज प्रसारित झाला.
आजचा भाग झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा कार्यक्रम गिनिज बुकमध्ये नोंदला जावा, अशी आशा व्यक्त केली. एका कार्यक्रमात सावंत म्हणाले की, देशातील एकाही पंतप्रधानाने अशा कार्यक्रमाचे शंभर भाग पूर्ण केले नसतील.
हा कार्यक्रम सर्वाधिक लोकांनी पाहिला आहे. पंतप्रधान देशातील लोकांशी संभाषण करत भारतातील लोकांच्या आकांक्षांना प्रेरणा देणाऱ्या, प्रोत्साहीत करणाऱ्या कथा शेअर करतात.
‘मन की बात'' हा कार्यक्रम भाजपचे सर्व मंत्री, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच जनतेसह विरोधी पक्ष नेत्यांनीही ऐकला. प्रदेश भाजपच्या वतीने शंभराव्या कार्यक्रमाचे बुथनिहाय प्रसारण दाखविण्यात आले.
बुथ प्रमुखांना कार्यक्रमावेळी झालेल्या गर्दीची छायाचित्रे पाठविण्यास आधीच भाजपने बजावले होते. या कार्यक्रमातील ‘बेटी बचाव, बेटी पढाव'' व ‘मुलीसमवेत सेल्फी’ या उपक्रमांचा केलेला उल्लेख कौतुकास्पद ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘मन की बात''दूरचित्रवाहिनीवरून पाहतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर अपलोड केली.
मोदींसारखा पंतप्रधान पाहिला नाही : चर्चिल
हा कार्यक्रम पाहिल्यानंतर चर्चिल आलेमाव म्हणाले की, मला भाजपचे काम आवडते. जरी मी या पक्षात प्रवेश केला नसला, तरीही त्यांच्या कामाची मला कल्पना आहे.
भाजप हा सर्व धर्मांना मानणारा पक्ष आहे. कुडतरी हा माझा मतदारसंघ असून इथून मी कधीही निवडून येऊ शकतो. कारण कुडतरीचे लोक माझ्यावर प्रेम करतात.
शिवाय, मी पंतप्रधान मोदींचा चाहता आहे. मी त्यांच्यासारखा पंतप्रधान कधीच पाहिला नाही. दूरचित्रवाहिनीवरून पाहतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर अपलोड केली.
मोदींसारखा पंतप्रधान पाहिला नाही : चर्चिल
हा कार्यक्रम पाहिल्यानंतर चर्चिल आलेमाव म्हणाले की, मला भाजपचे काम आवडते. जरी मी या पक्षात प्रवेश केला नसला, तरीही त्यांच्या कामाची मला कल्पना आहे.
भाजप हा सर्व धर्मांना मानणारा पक्ष आहे. कुडतरी हा माझा मतदारसंघ असून इथून मी कधीही निवडून येऊ शकतो. कारण कुडतरीचे लोक माझ्यावर प्रेम करतात. शिवाय, मी पंतप्रधान मोदींचा चाहता आहे. मी त्यांच्यासारखा पंतप्रधान कधीच पाहिला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.