National Autocross Championship: दिल्लीचा फिलिप्पोस ऑटोक्रॉसमध्ये विजेता, तर गोव्याचा सामाग ठरला वेगवान रेसर

राष्ट्रीय स्पर्धेचा दुसरा टप्पा फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानावर शनिवारी व रविवारी झाला.
National Autocross Championship
National Autocross ChampionshipDainik Gomantak
Published on
Updated on

National Autocross Championship पेशाने वकील, पण आता देशातील आघाडीचा ऑटोरेसर या नात्याने ठसा उमटवलेल्या दिल्लीच्या फिलिप्पोस मथाई याने यंदाच्या भारतीय राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धेच्या गोव्यातील टप्प्यात विजेतेपद मिळविले. गोमंतकीय ड्रायव्हर सामग कुडचडकर स्पर्धेतील सर्वांत वेगवान रेसर ठरला.

राष्ट्रीय स्पर्धेचा दुसरा टप्पा फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानावर शनिवारी व रविवारी झाला. राष्ट्रीय स्पर्धेत दोन वेळा जेतेपद मिळविलेल्या फिलिप्पोस याने एकंदरीत 1मिनिट 36. 37 सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक मिळविला. त्यानंतरचे तिन्ही क्रमांक गोमंतकीय ड्रायव्हरनी प्राप्त केले.

अझिम हान्ची (१ः४०ः६४), अमेय देसाई (१ः४१ः०६), सामग कुडचडकर (१ः४१ः८१) यांना अनुक्रमे दुसरा ते चौथा क्रमांक मिळाला. एकूण आठ प्रकारात स्पर्धा झाली.

गोव्याचा २७ वर्षीय सामग याने स्पर्धेच्या ‘टाईम ॲटॅक’ प्रकारात सर्वांत वेगवान वेळ देताना १.२ ट्रॅक किलोमीटर अंतर १ मिनिट ३६.२२ सेकंदात पार केले.

गोमंतकीय पुरुष ड्रायव्हरमध्ये सामग, अमेय व अझिम यांना ‘टाईम ॲटॅक’ प्रकारात पहिले तीन क्रमांक मिळाले. गोमंतकीय महिला गटात कर्तवी माशेलकर मराठे, अश्रफी गायकवाड, रेश्मा हुसेन यांनी ‘टाईम ॲटॅक’ प्रकारात अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला.

National Autocross Championship
Yuri Alemao: चांदोर येथील 'ते दोन्ही मार्ग' चालू ठेवा- आलेमाव

राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा

फर्मागुढीच्या ट्रॅकवरील आपल्या कामगिरीबद्दल सामग कुडतरकर याने आनंद व्यक्त केला. ट्रॅक वेगवान असला तरी ड्रायव्हिंगसाठी सुरक्षित होता. टोकदार वळणांवर वेग कमी करावा लागला, असे त्याने सांगितले.

त्याची ही दुसरीच राष्ट्रीय ऑटोक्रॉस स्पर्धा आहे. भावी कारकिर्दीसाठी त्याने गोवा क्रीडा प्राधिकरण व क्रीडामंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा बाळगली आहे.

तो म्हणाला, ‘‘रेसिंग खेळ खूप महागडा आहे. राज्य सरकारचे पाठबळ मिळाल्यास गोमंतकीय ड्रायव्हर देशभरातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत भाग घेऊ शकतील.’’

प्रदीप नायर सर्वांत ज्येष्ठ स्पर्धक

मुंबई येथील प्रदीप नायर फर्मागुढी येथील स्पर्धेतील सर्वांत ज्येष्ठ रेसर ठरला. 67 वर्षीय प्रदीप पाच दशके रेसिंग व रॅली शर्यतीत भाग घेत आहे.

फॉर्म्युला इंडियन ग्रांप्रि रेसिंगमध्ये त्याने तीन वेळा विजेतेपदही मिळविले आहे. ‘‘रेसिंग माझ्या रक्तात भिनले आहे. हल्ली मी डर्ट ट्रॅक रेसिंगचा आनंद लुटत आहे,’’ असे प्रदीप म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com