Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident: रविवार ठरला घातवार; तीन अपघातांत 3 तरुणांचा मृत्‍यू

आठवड्यात 8 बळी : वास्‍कोत पोलिसांना चकवा देताना दोघे गतप्राण
Published on

Goa Accident गस्तीवरील पोलिसांना चकवा देण्‍याच्‍या नादात वास्कोत रविवारी सायंकाळी दुचाकी कदंब बसवर आपटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला.

दुसरीकडे वेर्णा येथे सकाळी झालेल्या अपघातात कारचालकाचा बळी गेला. रात्री उशिरा कुंडई येथे ट्रक अपघातात एक दुकान, 7 वाहनांचे नुकसान झाले, सुदैवाने जीवितहानी टळली. गेल्या आठ दिवसांत रस्ते अपघातांत आठ जणांचा बळी गेला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बिर्ला-झुआरीनगर येथील प्रकाश बिंद (वय 30 वर्षे, स्कूटरचालक), अरुणकुमार सरोज (वय 19 वर्षे) आणि रितिशकुमार सरोज (वय 29 वर्षे) हे तिघे एकाच दुचाकीवरून रविवारी संध्याकाळी 6.30 वाजण्‍याच्‍या सुमारास चालले होते.

वास्को पोलिसांची डोंगरी भागात गस्त असल्याने तेथून त्यांची पीसीआर व्हॅन वास्को येथील मासळी मार्केट परिसरातून जात होती. ट्रिपल सीट असल्याने पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होणार, या भीतीने चालकाने वाहन वेगाने नेले असावे.

त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी कदंब बसच्या चाकाखाली सापडून एकाचा जागीच मृत्यू झाला. दोघा जखमींना इस्पितळात नेले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Goa Accident
Yuri Alemao: चांदोर येथील 'ते दोन्ही मार्ग' चालू ठेवा- आलेमाव

नागरिकांचे रास्‍तारोको

कुंडई-मानसवाडा हमरस्‍त्‍यावर मालवाहू ट्रकवरील ताबा सुटून झालेल्‍या अपघातात एक दुकान व 7 वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यावेळी तेथे कोणी नव्‍हते म्‍हणून मनुष्‍यहानी टळली. हा अपघात रविवारी रात्री 10.15च्‍या सुमारास झाला.

ट्रक फोंड्याहून पणजीच्‍या दिशेने चालला होता. कुंडई-मानसवाडा येथील उतारावरील वळणावर चालकाचा ताबा सुटला व ट्रक नजीकच्‍या बंद दुकानाला भेदत पुढे गेला. रस्‍त्‍यानजीक पार्क केलेल्‍या 2 कार, 5 दुचाकींचे मोठे नुकसान झाले. लोकांनी रास्‍तारोको आंदोलन सुरू केले होते.

तीन महिन्‍यांपूर्वी आज अपघात घडला तेथेच एक ट्रक रस्‍ता सोडून दुकानात घुसला होता. त्‍यात 5 जण जखमी, तर एकाचा मृत्‍यू झाला होता. लोकांनी ‘प्रशासनाने धोकादायक रस्‍त्‍याची दखल घ्‍यावी’, अशी मागणी केली होती.

Goa Accident
National Autocross Championship: दिल्लीचा फिलिप्पोस ऑटोक्रॉसमध्ये विजेता, तर गोव्याचा सामाग ठरला वेगवान रेसर

अपघातप्रवण क्षेत्रांत सुधारणा कधी?

रस्ते अपघातांचे प्रमाण वाढल्याने सरकारने वाहतूक पोलिस, वाहतूक खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघातप्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या, तसेच आराखडाही तयार केला होता.

तरीही अपघातप्रवण क्षेत्रांत सुधारणा केलेली नाही. रस्त्याच्या बाजूने सूचना फलकही लावलेले नाहीत. दुभाजक रेषा ओलांडून ओव्हरटेक करतानाही अपघात होत आहेत.

टेम्‍पोच्या धडकेत कारचालक ठार

वेर्णा : बायपास रोडवर आज, रविवारी सकाळी टेम्पोला कारने जोरात धडक दिल्याने उतोर्डा येथील मॅक आर्थर परेरा (23) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ‌वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.10 वाजण्‍याच्‍या सुमारास हा अपघात झाला.

मॅक हा आपल्या कारने (जीए : 08 एम 7600) कुठ्ठाळीहून उतोर्डा येथे घरी जात होता, तर टेम्पो मडगावहून पणजीच्या दिशेने चालला होता. वेर्णा येथे बायपास रोडवर कारने टेम्पोला धडक दिली. यात मॅकचा जागीच मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com