Goa Congress: "मी जनतेचे प्रश्न मांडले, म्हणूनच हकालपट्टी'', मनीषा उसगावकरांचा आरोप; काँग्रेसमधील राजकीय समीकरणांवर रोखठोक भाष्य

Manisha Usgaonkar on Goa Congress: काँग्रेस पक्ष बळकट व्हावा यासाठी मी गेली साडेचार वर्षे झोकून देऊन काम केले, वाळपईत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात लढा दिला.
Manisha Usgaonkar on Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काँग्रेस पक्ष बळकट व्हावा यासाठी मी गेली साडेचार वर्षे झोकून देऊन काम केले, वाळपईत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात लढा दिला. परंतु, अमित पाटकर वगळता इतर काँग्रेस नेते तसेच आमदारांकडून मला कसलेच सहकार्य लाभले नाही. मी जनतेचे प्रश्न मांडते आणि आरोप करते, त्यामुळेच मला निलंबित केले असावे, असे मनीषा उसगावकर यांनी सांगितले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘ब्लॅक ॲण्ड व्हाईट’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उसगावकर म्हणाल्या, म्हादईचा विषय असेल किंवा वाळपईतील इतर विषय असेल, या एकाही प्रश्नावर आजपर्यंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव तसेच इतर नेते कधीच बोलताना दिसले नाहीत.

Manisha Usgaonkar on Goa Congress
Goa Politics: गोव्यात नव्या प्रादेशिक पक्षाची चर्चा; राजकीय गती की विरोधकांची अधोगती?

ते गोवा राखण यात्रा काढू इच्छित आहेत, त्याची सुरुवात त्यांनी वाळपईतून करावी. वाळपईतील जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस पक्षात ज्यावेळी माझा प्रवेश झाला, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

परंतु, पाटकर यांच्याकडून काँग्रेसचे योग्यरीत्या काम करत असताना पक्षाची जबाबदार पदाधिकारी म्हणून प्रश्न विचारल्यावर बडतर्फीची कारवाई करणे कितपत योग्य आहे? शिस्तपालन समितीद्वारे चौकशी हा केवळ सोपस्कार होता. त्यांना मला बडतर्फ करायचेच होते, हे स्पष्ट असल्याचे उसगावकर यांनी सांगितले.

Manisha Usgaonkar on Goa Congress
Goa Opposition Alliance: 'युरी-विजय वादावरुन गोमंतकीयांचा दोन्ही पक्षांवरील विश्वास उडेल!', अमित पाटकरांनी व्यक्त केली जाहीर नाराजी

जनतेचे प्रश्न घेऊन लढणार

मला जरी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले असले, तरी माझी सामाजिक बांधिलकी मी कायम राखत जनतेचे प्रश्न घेऊन मी सदोदित लढत राहणार आहे. मला २०२७ मध्ये पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आलेले नको आहे. त्यामुळे जे प्रादेशिक पक्ष गोवा राखण्यासाठी सरकारविरोधात लढा देतील, त्यांच्यासोबत कायम राहणार आहे, असेही मनीषा उसगावकर यांनी सांगितले.

काय म्हणाल्या उसगावकर...

काँग्रेसने निष्ठावंतांना बडतर्फ करून खोगीरभरती सुरू केली आहे, परंतु ज्यांना पक्षप्रवेश दिला जात आहे, त्यांना पारखूनच प्रवेश द्यावा.

ज्यावेळी माझ्या घरावर दगड मारण्यात आले, त्यावेळी अमित पाटकर वगळता इतर काँग्रेस नेत्यांनी साधी विचारपूसदेखील केली नाही.

आज सर्वांची नजर ही मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीकडे लागली आहे, परंतु ती मिळविण्यासाठी पहिल्यांदा २२ आमदार निवडून आणायला हवेत, हे काँग्रेसचे नेते विसरत आहेत.

माझ्या बडतर्फीची माहिती माझ्यापूर्वी सत्तरीतील आमदारांना कळाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com