पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Admission Fraud: पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील चार जणांनी गोव्यातील एका महिलेची तब्बल १२.८६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Admission Fraud
Admission FraudDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील चार जणांनी गोव्यातील एका महिलेची तब्बल १२.८६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मांगोरहिल येथील दीपमाला कांबळे यांनी या प्रकरणी वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

दीपमाला कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, ऑगस्ट २०२३ पासून महाराष्ट्रातील नेहा कांबळे, उत्तम कांबळे, सुहासिनी कांबळे आणि आकाश डांगे या चौघांनी त्यांच्या मुलाला पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Veterinary College) प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्याच्या नावाखाली त्यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १२ लाख ८६ हजार रुपये घेतले. प्रत्येक वेळी नवीन कारणे देत आणखी पैसे मागितले जात होते, असेही तक्रारीत नमूद आहे.

Admission Fraud
Goa Crime: विवाहीत असून जबरदस्तीनं अल्पवयीन मुलीशी केलं लग्न, मुख्य आरोपीसह आई व दोन नातेवाईक अडकले; कोर्टाकडून आरोप निश्चित

पैसे घेतल्यानंतरही प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन आरोपींनी पूर्ण केले नाही. प्रवेशाची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही त्यांनी थोडा वेळ द्या, प्रक्रिया सुरू आहे अशा खोट्या हमी देत दीपमाला यांना दिशाभूल केले.

पैसे परत करण्याबाबत विचारणा केली असता आरोपी टाळाटाळच करत राहिले. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि फसवणूक निश्चित झाल्याचे लक्षात आल्यानंतर दीपमाला यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.

या तक्रारीची वास्को पोलीस ठाण्याचे PSI प्लेटो कार्व्हालो यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित चौघांविरुद्ध फसवणुकीसह विश्वासघाताचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून घेतलेल्या पैशांच्या व्यवहारांचे पुरावे, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि मोबाईलमधील संवादांची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील प्रत्येक आर्थिक व्यवहाराची काटेकोर तपासणी केली जात आहे.

Admission Fraud
South Goa Hotel Inspection: हडफडेच्या आगीचा धसका! दक्षिण गोव्यातील 15 हॉटेल्स-पब्जकडे NOC चं नाही, तपासणीत मोठा खुलासा

तपासाचा पुढील टप्पा म्हणून तक्रारदार आणि आरोपींचे औपचारिक जबाब नोंदवले जाणार आहेत. गोळा केलेल्या माहितीवरून गुन्ह्याचे स्वरूप आणि आरोपांची सत्यता तपासली जाईल. पोलिस सूत्रांच्या मते, या प्रकरणात आणखी गोष्टी समोर येण्याची शक्यता असून लवकरच संपूर्ण प्रकरणातील सत्यता स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com