Goa Accident: ताबा सुटला, गोव्यात पर्यटकाची कार भिंतीला - ट्रकला धडकली; झारखंडची व्यक्ती जागीच ठार; Watch Video

Siolim Accident: कारने प्रथम रस्त्यालगत असलेल्या संरक्षक भिंतीला धडक दिली आणि त्यानंतर तेथेच पार्क केलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली.
Siolim Accident
Goa tourist accidentDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: चोपडे मार्गे शिवोलीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या पर्यटकांच्या कारने रस्त्यालगत उभ्या केलेल्या ट्रकला शुक्रवारी पहाटे जबरदस्त धडक दिली. या अपघातात झारखंडमधील मिलिंद उज्ज्वल सिन्हा (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी स्मिता सिन्हा किरकोळ जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिन्हा दाम्पत्य सुट्ट्यांनिमित्त गोव्यात पर्यटनासाठी आले होते. शुक्रवारी पहाटे ते चोपडे मार्गे शिवोलीकडे कारने जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला.

Siolim Accident
Borim Accident: बोरी येथे कार आणि स्कूटर यांच्यात धडक, सुदैवाने जीवीतहानी टळली

कारने प्रथम रस्त्यालगत असलेल्या संरक्षक भिंतीला धडक दिली आणि त्यानंतर तेथेच पार्क केलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत कारचा पुढचा भाग पूर्णतः चुराडा झाला. घटनास्थळीच मिलिंद सिन्हा यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नीला जखमा झाल्या आहेत.

Siolim Accident
Bus Accident: भीषण अपघात! बस दरीत कोसळून 42 जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवून बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास शिवोली पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com