Mandovi River Water Pollution Report: कॅसिनो आणि सागरी नौकांच्या परिसरातील मांडवी नदीचे पाणी किती सुरक्षित? प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुसरा अंतरिम अहवाल सादर!

mandovi river water pollution report goa: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत आपला दुसरा अंतरिम अहवाल सादर केला आहे.
Mandovi River Water Pollution Report
Mandovi River Water Pollution ReportDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मांडवी नदीतील रासायनिक घटक पूर्णपणे सुरक्षित मर्यादेत असले, तरी कॅसिनो आणि सागरी नौकांचा वावर असलेल्या परिसरात ‘फेकल कॉलिफॉर्म’ या धोकादायक जिवाणूंचे प्रमाण अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचा अहवाल गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा खंडपीठात सादर केला आहे.

गोवा (Goa) राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत आपला दुसरा अंतरिम अहवाल सादर केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २४ ऑगस्ट रोजी पावसाळ्यात नदीतील २२ विविध ठिकाणावरून नमुने गोळा करण्यात आले होते. या पाहणीनुसार मांडवी नदीतील रसायनांचे प्रमाण सुरक्षित मर्यादेत असले, तरी पूर्ण अभ्यास क्षेत्रात ‘फेकल कॉलिफॉर्म’ (मानवी/प्राण्यांच्या विष्ठेतील जिवाणू) घटकाचे प्रमाण मानकांपेक्षा जास्त आणि गंभीर असल्याचे समोर आले आहे.

Mandovi River Water Pollution Report
Mandovi River Goa: मांडवीचे विराट रूप अन् तिच्या पात्रातील 'आठवे बेट' आखाडा; जकातीपासून देवालयांपर्यंतचा रंजक इतिहास

प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी पूल (वरचा प्रवाह) ते ‘इफ्फी’ जेटी (खालील प्रवाह) दरम्यानच्या २२ ठिकाणी भरती आणि ओहोटीच्या वेळी पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली. प्रामुख्याने ‘एसडब्ल्यू-२’ (अंघोळ करणे, जलक्रीडा आणि व्यावसायिक मासेमारीसाठी वापरले जाणारे पाणी) क्षेत्रात उभ्या असलेल्या कॅसिनो बोटी व अन्य सागरी नौकांच्या आसपासचा भाग या अभ्यासात समाविष्ट करण्यात आला होता. अहवालानुसार नदीच्या रासायनिक आरोग्याबाबत मात्र दिलासा मिळाला आहे.

Mandovi River Water Pollution Report
Mandovi River Pollution: मांडवी नदी प्रदूषणावर हायकोर्टात सुनावणी; खाडी परिसरातील प्रत्येक आस्थापनाची तपासणी करण्याची सूचना

जीएसपीसीबीतर्फे सखोल पाहणी

फेकल कॉलिफॉर्मबाबत जीएसपीसीबीने पणजी आणि बेती किनारपट्टीवरील नाल्यांची सखोल पाहणी केली. यामध्ये बिगर-बिंदू स्त्रोतांतून येणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी या प्रदूषणास मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पणजीच्या बाजूने वाहणारा सांतइनेज नाला नदीत सर्वाधिक प्रदूषित सांडपाणी सोडत असल्याचे अहवालात नमूद आहे. या नाल्यातून प्रतिमिनीट १०,००० ते १५,००० लिटर काळ्या रंगाचे, कुजलेले सेंद्रिय पदार्थ असलेले दुर्गंधीयुक्त सांडपाणी नदीत मिसळत आहे. या नाल्यामुळे नदीचा तब्बल ७० मीटरचा भाग दूषित झाला आहे.

Mandovi River Water Pollution Report
Mandovi River: मांडवीत प्रदूषण करणाऱ्यांवर नजर; सांडपाणी सोडणाऱ्यांचा शोध सुरू, 'प्रदूषण नियंत्रण'कडून तपासणी

‘प्रदूषणाचा उगम होणार स्पष्ट’

राज्याचे महाधिवक्ता देविदास पांगम यांनी सांगितले की, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा एक अंतरिम अहवाल तयार केला असून तो न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयीन मित्रालाही या अहवालाची प्रत दिली आहे. या अहवालानुसार मांडवी नदीची एकूणच स्थिती चांगली असल्याचे दिसून येते. मात्र, विष्ठेतील जिवाणूंचे (फेकल कंटेंट्स) प्रमाण सातत्याने उच्च पातळीवर असल्याचे आढळले आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळ या जिवाणूंच्या विसर्जनाचा मुख्य स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com