Mandovi River: मांडवीत प्रदूषण करणाऱ्यांवर नजर; सांडपाणी सोडणाऱ्यांचा शोध सुरू, 'प्रदूषण नियंत्रण'कडून तपासणी

Mandovi River Pollution: मळा तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याच्या घटनेनंतर उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत मांडवी नदीच्या प्रदूषणप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते.
Mandovi River
Mandovi River PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मांडवी नदीतील वाढत्या प्रदूषणामुळे विशेषतः ऑफशोअर कॅसिनो जहाजांच्या परिसरातील पाण्यात आढळणाऱ्या ‘फिकल कोलीफॉर्म’ जीवाणूंच्या धोक्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मांडवी नदीच्या पाणी गुणवत्तेची सविस्तर तपासणी सुरू केली असून याबाबतचा प्रगती अहवाल न्यायालयासमोर सादर केला आहे.

मळा तलावात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याच्या घटनेनंतर उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत मांडवी नदीच्या प्रदूषणप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. ६ मे २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, इफ्फी जेटी ते मांडवी पूल या पट्ट्यात नदीच्या पाणी गुणवत्तेचा सविस्तर वैज्ञानिक अभ्यास करण्याचे निर्देश मंडळाला देण्यात आले होते.

Mandovi River
Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. गीता नागवेकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले की, मंडळाने या अभ्यासाचा अंतरिम अहवाल तयार केला आहे. कला अकादमी ते मांडवी पूल (पणजीकडील बाजू) आणि रेईस मागूश चर्च ते मांडवी पूल (दुसरी बाजू) या नदीकाठच्या भागात मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी आणि सर्वेक्षण केले जात आहे. याद्वारे नदीत सांडपाणी सोडणारे स्रोत शोधले जात आहेत.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

नदीकाठच्या व्यावसायिक आस्थापनांकडे मंडळाचे वैध ‘संमती पत्र’ आहे का आणि ते पर्यावरण नियमांचे पालन करत आहेत का, याचीही तपासणी केली जाणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०१६ ते २०२६ या दहा वर्षांतील मांडवी नदीच्या पाणी गुणवत्तेचा स्वतंत्र अहवालही तयार केला असून तो राष्ट्रीय जल गुणवत्ता देखरेख कार्यक्रमाच्या आकडेवारीवर आधारीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com