Facebook fraud: मुख्यमंत्र्यांना पैसे मागणारा भामटा गजाआड

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या नावाने बोगस फेसबुक (fake facebook account) अकाऊंट उघडून ‘पे टीएम’वर पैसे ट्रान्स्फर करा असा SMS केला होता
मुख्यमंत्र्यांना पैसे मागणारा भामटा गजाआड
मुख्यमंत्र्यांना पैसे मागणारा भामटा गजाआडDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्या नावाने बोगस फेसबुक (fake facebook account) अकाऊंट उघडून ‘पे टीएम’वर पैसे ट्रान्स्फर करा असा संदेश देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला सायबर क्राईमच्या गोवा पथकाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश पोलिसांनी मेवत (हरियाणा) येथे अटक केली. अटकेवेळी त्याच्याजवळ सुमारे 200 मोबाईल सिमकार्डे सापडली आहेत. संशयित महम्मद सकीर हुसेन (रा. बिस्मरा - हरियाणा) याला गोवा पोलिसांनी तेथे जाऊन ताब्यात घेऊन गोव्यात आणले आहे. त्याला पोलिस कोठडी घेण्यात आली असल्याची माहिती क्राईम ब्रँचचा अतिरिक्त ताबा असलेले पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली. (Man who made fake Facebook accounts of Goa Chief Minister arrested from Uttar Pradesh)

मुख्यमंत्र्यांना पैसे मागणारा भामटा गजाआड
Goa: भूमिपुत्र विधेयकामागे भाजपचा डाव

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नावाने फेसबुकवरून पैशांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास येताच गुन्हा अन्वेषण विभागाच्या सायबर क्राईम विभागाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध 20 जुलै 2021 रोजी गुन्हा नोंद केला होता. हे फेसबुक अकाऊंट 16 जुलै 2021 रोजी उघडण्यात आले होते. या अकाऊंटला त्या अज्ञाताने मुख्यमंत्र्यांचे नाव व छायाचित्र डाऊनलोड केले होते. त्या अकाऊंटवरून ‘पे टीएम’ने पैसे जमा करण्याचे विनंती केली होती.

मुख्यमंत्र्यांना पैसे मागणारा भामटा गजाआड
Goa: डिचोलीत पुरामुळे 1.43 कोटींचे नुकसान

या प्रकरणाचा तपास सायबर क्राईम विभागाचे पोलिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करत होते. या तपासणीमध्ये अज्ञात व्यक्तीने हा गुन्हा मेवत, हरियाणा (मथुरा - उत्तर प्रदेश) येथून केला असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार या संशयिताची माहिती मेवत - उत्तरप्रदेशचे पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजरनिया (आयपीएस) यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली मथुरा पोलिसांनी संशयित महम्मद सकीर हुसेन याला सापळा रचून गजाआड केले. त्याने पोलिसांनी लावलेल्या सापळ्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते शक्य झाले नाही. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याजवळ 200 मोबाईल सिमकार्डे सापडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com