Ration scam: धान्य तस्करी प्रकरणात क्राईम ब्रँचला न्यायालयाने फटकारले

राज्यात रंगू लागल्या चर्चा
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात शासकीय गोदामातील तांदूळ व गहू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार 13 नोव्हेंबर रोजी उघड झाला आहे. यावरुन गोवा सरकार अन् विरोधी पक्षात आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन बोरकर याने न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. यावर आज सुनावणी पार पडली असून सुनावणी दरम्यान न्यायालयाने क्राईम ब्रँचला फटकारले आहे.

(ration smuggling case hearing will be held on December 2)

Court
Lusophone Festival in Goa: गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय लुसोफोन महोत्सव काय आहे? जाणून घ्या ऐतिहासिक संबंध

सुनावणी दरम्यान न्यायालयाने क्राईम ब्रँचने योग्यरीत्या माहिती सादर केली नसल्याचे स्पष्ट करत फटकारले आहे. तसेच सचिन नाईक व विरेंद्र मार्दोळकर या दोघांनी दाखल केलेल्या अटक पूर्व जामीन याचिकेवर 2 डिसेंबर रोजी निवाडा होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र क्राईम ब्रँचच्या कामकाजावर न्यायालयाने बोट ठेवल्याने राज्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Court
Goa Crime Cases: गोव्यात वाढली गुंडगिरी, पोलिसांचा धाक संपला का?

या प्रकरणावरुन काँग्रेसने या आधीच स्पष्ट केले आहे की, 2020 पासून नागरी पुरवठा खात्याच्या कामाचा पूर्ण लेखाजोखा तपासून पाहावा. तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी अथवा या खात्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी, त्यामुळे सत्य बाहेर येईल. यातच न्यायालयाने आजच्या सुनावणी दरम्यान माहितीवरील प्रश्नावरुन क्राईम ब्रँचला फटकारल्याने पुन्हा चर्चेला उधान येणार का? हे पहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Land Grab Scam
Goa teacher sentenced 11 years
Bye-Election Legal Dispute India
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com