Maimollem: मायमोळेत डोंगर कोसळण्याच्या मार्गावर! डोंगर माथ्यावरील 2 घरांना धोका; वाहनचालकांत भीती

Maimollem Mangor Hill Road: मायमोळे येथे मुख्य रस्त्याशेजारी डोंगराळ भाग कोसळण्याच्या मार्गावर असून त्यामुळे वाहनचालकांना, पादचाऱ्यांना तसेच या डोंगर माथ्यावर असलेल्या दोन इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
Maimollem
Maimollem Mangor HillDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मायमोळे येथे मुख्य रस्त्याशेजारी डोंगराळ भाग कोसळण्याच्या मार्गावर असून त्यामुळे वाहनचालकांना, पादचाऱ्यांना तसेच या डोंगर माथ्यावर असलेल्या दोन इमारतींना धोका निर्माण झाला आहे.

मायमोळे ते मांगोरहिलच्या दिशेने जाताना मुख्य रस्त्याच्या शेजारी महेश गॅरेज समोरील डोंगराळ भाग धोकादायक बनला आहे. या डोंगराळ भागाची माती खचून गेली आहे. मोठे दगड उघडे पडले आहेत. ते या पावसात केव्हाही कोसळू शकतात.

Maimollem
Underwater Landslide: पाण्याखाली मोठ्या भूस्खलनाची नोंद! NIO दोनापावलाचा शोध; काय होणार परिणाम? वाचा

तसेच जरा पुढे गेले ती तीच स्थिती आहे. या भागात डोंगर माथ्यावर दोन इमारती उभ्या आहेत. या इमारतीच्या मागच्या बाजूला म्हणजेच मुख्य रस्त्याशेजारी व इमारतीच्या खालच्या भागाची माती पावसात वाहून गेली आहे. तसेच त्या ठिकाणी चार पाच मोठे वृक्ष आहेत व लहान संरक्षक भिंत आहे. माती वाहून गेल्याने हे वृक्ष तसेच भिंत धोकादायक स्थितीत आहे.

Maimollem
Goa Landslide: पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोव्यात दुर्घटना, दरड कोसळून दोन घरांचे नुकसान

पावसाने रुद्रावतार घेतला, तर ही झाडे, संरक्षक भिंत केव्हाही कोसळून या इमारतीबरोबर मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या शेकडो वाहनांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. तसेच पादचाऱ्यांचीही तीच स्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com