Underwater Landslide: पाण्याखाली मोठ्या भूस्खलनाची नोंद! NIO दोनापावलाचा शोध; काय होणार परिणाम? वाचा

NIO scientific study Dona Paula: या आपत्तीजनक भूस्खलनाचा शोध टाईम-लॅप्स भूभौतिकीय डेटाच्या साहाय्याने लावण्यात आला असून हा प्रकार या क्षेत्रातील सर्वांत मोठ्या पाण्याखालील भूस्खलनांपैकी एक मानला जात आहे.
NIO Dona Paula scientific study
NIO scientific study underwater landslide Dainik Gomantak
Published on
Updated on

Krishna-Godavari Basin Bay of Bengal underwater landslide NIO Report

पणजी: कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात, बंगालच्या उपसागरात, एका पाण्याखालील भूस्खलनाची नोंद दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) एका क्रांतिकारक अशा वैज्ञानिक अभ्यासामध्ये करण्यात आली आहे. ही घटना अपतटीय सागरी पायाभूत सुविधांना, पाण्याखालील संप्रेषण केबल्सना आणि किनारी भागातील समुदायांना धोका निर्माण करू शकते.

या आपत्तीजनक भूस्खलनाचा शोध टाईम-लॅप्स भूभौतिकीय डेटाच्या साहाय्याने लावण्यात आला असून हा प्रकार या क्षेत्रातील सर्वांत मोठ्या पाण्याखालील भूस्खलनांपैकी एक मानला जात आहे. हा अभ्यास सखोल पाण्यातील भू-संकटांचे निरीक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.

हे भूस्खलन जानेवारी २००९ ते डिसेंबर २०१५ दरम्यान घडले असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यामुळे सुमारे १६० मीटर जाडीचा गाळाचा स्तर कमी झाला असून, सुमारे ११ किलोमीटर पदार्थ शेल्फ क्षेत्रातून विस्थापित झाले आहेत. या घटनेमुळे सुमारे ७० किलोमीटर क्षेत्र व्यापणारी, पंख्यासारखी मास ट्रान्सपोर्ट डिपॉझिट (एमटीडी) तयार झाली आहे, जी ९५० ते ११०० मीटर खोलीवर असून, तिची जास्तीत जास्त जाडी ६० मीटर आहे.

NIO Dona Paula scientific study
Goa Weather: गोव्यात नेमकं चाललंय काय? नागरिक पुरते हैराण..

समुद्रावरील उद्योगांवर प्रभाव शक्य

1. या संशोधनातून खोल पाण्यातील भू-संकटांमध्ये अवसादी घटकांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यामध्ये असे दिसून आले आहे की, मध्यम तीव्रतेच्या घटकांमुळे, जसे की चक्रीवादळ किंवा स्थानिक भूकंपामुळेही, मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊ शकते.

2. या संशोधनाने खंडीय काठावरील अस्थिर उतार भागांचे अधिकाधिक भूभौतिकीय सर्वेक्षण व निरीक्षण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. या शोधाचा समुद्रावरील उद्योगांवर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com