Mahesh Kale: 31 डिसेंबरला 'मैफिल रंगणार' पण 'सुरांची'; साखळीत महेश काळेंच्या संगीताचा कार्यक्रम

Mahesh Kale Concert Goa: ३१ डिसेंबरच्या दिवशी गोव्यात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होत असल्याने शास्त्रीय संगीतप्रेमी सुखावले आहेत
Mahesh Kale
Goa New Year Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: ३१ डिसेंबर म्हटलं म्हणजे गोव्यात केवळ पार्टी आणि मौजमस्ती एवढाच प्रकार सुरु असतो असा एक समज आहे. पण यंदाच्या वर्षी याचंच एक विरुद्ध टोक आपल्याला गोव्यात पाहायला मिळेल. मराठी संगीत सृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजेच महेश काळे सध्या गोव्यात असून मंगळवार (३१ डिसेंबर) रोजी साखळी रवींद्र भवनात त्याचा संगीताचा कार्यक्रम रंगणार आहे. ३१ डिसेंबरच्या दिवशी गोव्यात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होत असल्याने शास्त्रीय संगीतप्रेमी सुखावले आहेत.

आज गोव्यात होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल बोलताना महेश काळे म्हणाला की, "गोवा हे माझे आवडते राज्य आहे. या प्रदेशात कार्यक्रम करायला मला नेहमीच आवडते. इथे ३१ डिसेंबर मौजमजा व धिंगाणा याचबरोबर चुकीच्या गोष्टी होत असतात. पण आपण जोपर्यंत स्वतःची कला जोपासत नाही, ती टिकत नाही आणि ३१ डिसेंबर रोजी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवणे हा एक स्तुत्य उपक्रम असून चांगला पायंडा आहे."

Mahesh Kale
New Year 2025: सरत्या वर्साक निरोप आनी नव्या वर्साक येवकार..

पद्मिनी फाऊंडेशन व मित्रपरिवार यांच्यातर्फे साखळीत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या मैफली निमित्त त्यांनी साखळीतील रवींद्र भवनाला भेट दिली व कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com