Anjuna Crime Goa Police: दिल्लीतील पर्यटकावर चाकू हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानात आता महाराष्ट्रातील पर्यटकाला मारहाणीची घटना समोर आली आहे. दरम्यान, पर्यटकाला मारहाण करणाऱ्या दोघांना हणजुणे पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर गोव्यातील म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी यांना 14 मार्च रोजी 10 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाकडून हणजुणे (Anjuna) पेट्रोल पंपाजवळ भांडण सुरू असल्याची माहिती देणारा कॉल आला.
त्यानुसार अंजुना पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तेव्हा महाराष्ट्रातील एक पर्यटक जखमी झाल्याचे दिसून आले. तसेच कारचे नुकसान झाले होते. जखमीला जिल्हा रुग्णालय म्हापसा येथे हलविण्यात आले.
जिवबा दळवी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी पर्यटकाशी चर्चा केली. पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनीही फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे जखमी पर्यटकाची विचारपूस केली. जखमी पर्यटकाच्या मित्राच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन अज्ञात व्यक्ती निळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून (GA-03-AK 5856) आले. त्यांनी फिर्यादीला अडवून जखमी ओंकार उपवणे (रा. कल्याण, मुंबई) याच्या डोक्यात दगड मारला तसेच सिमेंटच्या विटांनी मारहाण केली.
त्यामुळे ओंकारला गंभीर दुखापत झाली. फिर्यादीच्या गाडीचेही नुकसान केले. फिर्यादीने आरोपींच्या मोटारसायकलला ओव्हरटेक केल्यामुळे आरोपींनी चिडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर विराज पार्सेकर (वय 25, बार्देश) आणि सिद्धांत खोरजुवेकर (वय 29, बार्देश गोवा) यांना पोलिसांनी अटक केली. दोघांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षख निधीन वाल्सन, म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, पोलिस उपनिरीक्षक साहिल वारंग, स्नेहा सावळ, हेड कॉन्स्टेबल सागर नाईक, कॉन्स्टेबल लक्ष्मण देसाई, महेंद्र मांद्रेकर, रुपेश आजगावकर आणि कृष्णा बुगडे यांनी तपास केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.