Goa Police: पोलिसांचा बँकांना अल्टीमेटम; 'या' तारखेपर्यंत एटीएम केंद्रांत सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही द्या, अन्यथा...

दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: राज्यांत मागच्या वर्षी कित्येक एटीएम मशीने चोरण्याच्या घटना घडल्याने आता यापुढे एटीएम केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बरोबरच सुरक्षा रक्षक ठेवणे बंधनकारक केली असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिली.

Goa Police
Goa Police: राजस्थानमध्ये केली चोरी; गोव्यात येऊन अडकला पोलिसांच्या जाळ्यात

मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात रावणफोंड व फोंडा येथे एटीएम मशिन्स चोरण्याच्या घटना घडल्या होत्या. हे असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यानी हा आदेश जारी केला असून 1 एप्रिलपासून ज्या केंद्रावर अशी व्यवस्था नसेल, त्या बँकावर करवाई केली जाणार असल्याचे त्यानी नमूद केले.

दक्षिण गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण मागच्या वर्षांच्या तुलनेत बरेच नियंत्रणात असल्याची माहिती देताना मागच्या वर्षी पहिल्या दोन महिन्यात 158 गुन्हेगारी प्रकरणे झाली होती. यंदा पहिल्या दोन महिन्यांत हे प्रमाण 70 पर्यंत खाली आले आहे.

हे प्रमाण आदल्या गुन्हेगारीच्या तुलनेने निम्मे असून यावेळी 80 टक्के गुन्हेगारीचा तपास लावण्यास पोलिसाना यश आल्याची माहिती त्यांनी दिली.

दक्षिण गोव्यात भुरट्या चोऱ्या आणि वाटमाऱ्यांचे प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती धानिया यांनी दिली. दक्षिण जिल्ह्यात अशा वाटमारींची 16 ठिकाणे पोलीसांच्या लक्षात आलेली असून तिथे नियंत्रण आणण्यासाठी गस्त वाढविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

Goa Police
Yuri Alemao: आगामी विधानसभा अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे 'हे' दोन महत्वाचे ठराव...

दक्षिण गोव्यातील सराईत गुन्हेगारावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. संपुर्ण जिल्ह्यात पोलिस रेकॉर्ड प्रमाणे 101 सराईत गुन्हेगार असून त्यातील 91 गुन्हेगारांचा येथे अजून वास्तव्य आहे. दोघांचा मृत्यू झाला असून दोघेजण राज्याच्या बाहेर आहेत. चार जण सध्या तुरुंगाची हवा खात असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीसांनी सध्या भाडेकरूंची माहिती घेण्याच्या प्रक्रियेत गती आणली आहे. मागच्या वर्षी पहिल्या दोन महिन्यांत पोलीसांनी 2763 जणांची छाननी केली होती यावेळी पहिल्या दोन महिन्यांत या छाननिची संख्या 4830 वर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.

प्रयास आणि तुमच्या शेजाऱ्यांना ओळखा या दोन माध्यमातून पोलीस ही माहिती गोळा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com