Goa Police
Goa Police Dainik Gomantak

Goa Police: राजस्थानमध्ये केली चोरी; गोव्यात येऊन अडकला पोलिसांच्या जाळ्यात

लॉरेन्स बिष्णोई गँगच्या गुंडाला पणजी पोलिसांनी केली अटक, राजस्थानातून झाला होता फरार
Published on

Goa Police: कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगमधील गुंडाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानमधील सरदारपुरा येथील पोलिसांसह पणजी पोलिसांनी ही संयुक्त मोहिम राबवली. पवन सोळंकी (वय 32) असे या गुंडाचे नाव असून तो मूळचा मांडोर, जोधपूर, राजस्थान येथील आहे. तो बिष्णोई टोळीमधील सक्रिय सदस्य आहे.

Goa Police
Yuri Alemao: आगामी विधानसभा अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे 'हे' दोन महत्वाचे ठराव...

सरदारपुरा येथील एका गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. सरदारपुरामधील गुन्ह्यानंतर तो फरार झाला होता. 04 मार्च रोजी जोधपूरमधील जेसाराम यांच्या घरी त्याने चोरी केली होती. चेहऱ्यावर मास्क लाऊन आणखी एका सहकाऱ्यासह त्याने ही चोरी केली होती.

त्यावेळी त्याने जेसाराम यांना कलेक्शन एजंट असल्याचे भासवत त्यांचे हातपाय बांधून त्यांना मारहाण केली होती. जेसाराम यांचे लाखो रूपये लुटून तो फरार झाला होता. दरम्यान, पणजी पोलिसांनी त्याचा ताबा सरदारपुरा पोलिसांकडे दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com