‘खड्डे’ गावातील महाजनांचा आरोप; संबंधितांवर कारवाईची मागणी

अधिकाऱ्यांच्‍या आदेशाने मंदिरात प्रवेश
श्री महामाया देवस्थान
श्री महामाया देवस्थानDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळ्ळी: खड्डे-बारशे येथील श्री भूमिपुरूष महामाया देवस्थान प्राकारात गावच्या एका गटाला मंदिर प्राकारात धार्मिक विधी, छत्रोत्सव व दिवजोत्सव करण्यास मनाई असताना ‘त्या’ आदेशाचे उलंघन करून बंदी घातलेल्या गटाला देवस्थान प्राकारात धार्मिक विधी करण्यास बेकायदेशीरपणे प्रवेश दिल्याबद्दल उपजिल्हाधिकारी व मामलेदार तसेच उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देवस्थानाचे पुजारी गुणो वेळीप, बुदवंत अर्जुन वेळीप, कृष्णा वेळीप, प्रभाकर वेळीप व देवस्थान महाजनांनी केली आहे.

श्री महामाया देवस्थान
फोंड्यात सार्वजनिक शिगमोत्सव उत्साहात!

पत्रकार परिषदेत बोलताना पुजारी गुणो वेळीप, कृष्णा वेळीप म्हणाले, केपेचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार व कुंकळळी पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंदिर परिसरात धार्मिक विधी करण्यास बंदी घातलेल्या गटाला धार्मिक विधी करण्यास देऊन सरकारी आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर मोडला याचे स्पष्टीकरण द्यावे. महाजनाचा अधिकार काढून घेण्याचा अधिकार यांना कोणी दिला. दादागिरी करून देवस्थानांच्या महाजनावर दबाव घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे.

श्री भूमीपुरुष महामाया देवस्थान समितीच्या महाजनांच्या दोन गटात गेल्या बारा वर्षांपासून अधिकारावरून वाद चालू आहे. 2019 साली केपेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गावचा वार्षिक छत्रोत्सव, गुडी व दिवजा उत्सवात कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून हस्तक्षेप करताना एक आदेश दिला होता.

श्री महामाया देवस्थान
‘आयआयटी’चे सांगेत स्वागत

या आदेशानुसार सकाळी दोन तास एका गटाने धार्मिक विधी करावे. नंतर दुसऱ्या गटाने आपले धार्मिक विधी करावे, मात्र दुसऱ्या गटाने मंदिर प्रकारात छत्र्या, दिवजा विधी करू नये, केवळ प्राकाराच्या बाहेर राहून विधी करावे, असे त्या आदेशात म्हटले आहे. आदेशाचे पालन व्हावे, म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला जातो. मंदिर प्राकार सील केला जातो. यंदाही प्रशासनाने व पोलिसांनी त्या संदर्भात सर्व सोपस्कार केले होते मात्र शुक्रवार १८ रोजी जत्रोत्सवाच्या दिवशी मामलेदारानी पहिल्या गटास मंदिरातून हाकलून लावले, सरकारी आदेश मोडून बेकायदेशीरपणे मंदिर प्राकारात धार्मिक विधी करण्यास दुसऱ्या गटाला मान्यता दिल्याचा आरोप पहिल्या गटाने केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून व आपल्या अधिकारावर गदा आणल्याचे मत महाजनातर्फे व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com