Goa IIT
Goa IIT Dainik Gomantak

‘आयआयटी’चे सांगेत स्वागत

सुभाष फळदेसाई: ग्रामस्थांचे सहकार्य मिळणार

केपे: ‘आयआयटी’सारखे प्रकल्प जर सांगेत आले, तर त्याचे नक्कीच स्वागत करून ते चालीस लावण्यास ग्रामस्थांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच संधी आम्ही कधीच सोडणार नसल्याचेही सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. सांगे येथे अयोजित होळी कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष केरोझ क्रूझ, माजी नगराध्यक्ष संजय रायकर, नगरसेवक प्रितीदास नाईक, सय्यद इक्बाल, सुप्रज तारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Goa IIT
फोंड्यात सार्वजनिक शिगमोत्सव उत्साहात!

सांगे मतदारसंघासाठी चांगले प्रकल्प आणण्यासाठी सदैव आपले प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आयआयटी’ सारख्या प्रकल्पामुळे सांगेचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे, तसेच कित्येक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने असे प्रकल्प सांगेसाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला भर राहणार आहे. मंत्रिपद मिळो अथवा न मिळो सांगे मतदारसंघाचा कायापालट करण्यास कोणतीच कसूर बाकी ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com