Delhi Liquor Scam: केजरीवालांचे भवितव्य आता गोव्यातील नेत्यांच्या हाती; मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अंतिम आरोपपत्र दाखल!

Delhi CM Arvind Kejriwal: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी पाचव्या आणि अंतिम आरोपपत्रात गोव्यातील दोन राजकीय नेत्यांनी दिलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Delhi Liquor Scam: केजरीवालांचे भवितव्य आता गोव्यातील नेत्यांच्या हाती; मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अंतिम आरोपपत्र दाखल!
Delhi CM Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी पाचव्या आणि अंतिम आरोपपत्रात गोव्यातील दोन राजकीय नेत्यांनी दिलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे केजरीवालांचे भवितव्य या दोन नेत्यांच्या हाती असून या नेत्यांनी त्यांच्या जबाबात काय म्हणणे मांडले आहे, हे सुनावणीवेळीच स्पष्ट होणार आहे. सीबीआयने याप्रकरणी जे अंतिम आरोपपत्र दाखल केले आहे, त्यात माजी मंत्री तथा आमदार महादेव नाईक आणि वाळपईचे ‘आप’चे नेते सत्यविजय नाईक यांच्या नावाचा समावेश असून, त्यांचा जबाब अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून सादर केला आहे.

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा देशभर गाजत आहे. या घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाच्या अनेक आमदार आणि खासदारांना अटक झाली होती. सध्या ते जामिनावर मुक्त झाले असले, तरी कायदेशीर कारवाईची टांगती तलवार अटळ आहे. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळा उघड झाल्यानंतर या कथित व्यवहारातील रक्कम गोव्यातील 2022 सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. ‘आप’च्या वतीने हे आरोप फेटाळले गेले असले, तरी सीबीआयने या प्रकरणात गोव्यात येऊन चौकशी केली होती.

Delhi Liquor Scam: केजरीवालांचे भवितव्य आता गोव्यातील नेत्यांच्या हाती; मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अंतिम आरोपपत्र दाखल!
Delhi Liquor Scam: केजरीवाल यांची अटक कायदेशीर; गोवा निवडणुकीतील मनी ट्रेलबाबत ED कडे भरपूर पुरावे

दोन नाईकांनी उलगडले गुपित

विधानसभेसाठी ज्यांना ‘आप’ने उमेदवारी दिली होती, त्या नेत्यांकडे सीबीआयतर्फे चौकशी करण्यात आली होती. माजी मंत्री महादेव नाईक आणि सत्यविजय नाईक यांनी 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीचा प्रचाराचा सर्व खर्च ‘आप’ने रोख स्वरूपात केला होता.

भाजपचे कटकारस्थान : ॲड. पालेकर

2022 ची निवडणूक आम्ही ‘आप’च्या तिकिटावर लढलो. पक्षाने 39 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मीही सांताक्रूझ मतदारसंघातून निवडणूक लढविली. मला पक्षाने कोणतेही आश्‍वासन दिले नव्हते. पक्षाने 39 ठिकाणी उमेदवार निवडून येण्यासाठी प्रचाराचा व इतर खर्च केला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी जो जबाब दिला, तो राजकीय हेतूने प्रेरित असेल. कारण दोन्ही नेते हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच असल्याने भाजपने त्यांना या आरोपाविषयी काही आमिष दाखविले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे आप’चे गोवा राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर म्हणाले.

Delhi Liquor Scam: केजरीवालांचे भवितव्य आता गोव्यातील नेत्यांच्या हाती; मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अंतिम आरोपपत्र दाखल!
Liquor Scam: राजकीय पाठिंब्याने गोव्यातून बनावट दारूची निर्यात : आपचा आरोप

माजी मंत्री महादेव नाईक हे शिरोडा मतदारसंघातून 2017 साली पराभूत झाल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाला जवळ केले आणि 2022 साली या पक्षाच्या उमेदवारीवरच निवडणूक लढविली होती; पण त्यांना त्यात यश आले नाही.

भाजपचे एकेकाळचे नेते सत्यविजय नाईक यांनीही बंडखोरी करीत ‘आप’मध्ये प्रवेश करीत वाळपई मतदारसंघातून विश्‍वजीत राणे यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. ऐन गणेशोत्सवातच सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्याने या दोन्ही नेत्यांची धाकधूक वाढली आहे. मात्र, जबाबांना सुरुवात झाल्यानंतरच त्यांना न्यायालयाकडून पाचारण होणार हे स्पष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com