Mahadayi Tiger Project : ‘व्याघ्र प्रकल्प’ नको, म्हणूनच सरकारी घाट

राजेंद्र केरकर यांची जाणवली उणीव : वन्य जीव मंडळ बैठकीत पर्यावरणप्रेमींना बोलण्यावर बंदी
Rajendra Kelkar
Rajendra KelkarDainik Gomantak

Mahadayi Tiger Project : म्हादई अभयारण्य हे राखीव व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे. परंतु राज्य वन्य जीव मंडळाच्या बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत व्याघ्र प्रकल्पाचे पुरस्कर्ते राजेंद्र केरकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली, तेच केवळ व्याघ्र प्रकल्पावर बोलू शकत होते, तेच नसल्याने व्याघ्र प्रकल्पाची गरज गोव्याला नसल्याचे सांगण्यात मंत्रिगण यशस्वी झाले. व्याघ्र प्रकल्प नको,म्हणूनच हा सरकारी घाट असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

वन्य जीव मंडळावर जे सदस्य आहेत, त्यांना व्याघ्र प्रकल्पाविषयी अभ्यासपूर्ण माहिती नाही, हे जाणूनच राज्य सरकारने आपला निर्णय रेटल्याची चर्चा पर्यावरणप्रेमींमध्ये सुरू झाली आहे. कर्नाटकचा म्हादई वळविण्याचा प्रयत्न हाणून पाडायचा झाल्यास म्हादई अभयारण्य हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करावे, असा एकमेव पर्याय असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

फाऊंडेशनने व्याघ्र प्रकल्प व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी लवकरच सुनावणी होणार असल्याचे दिसत असल्याने गोवा वन्यजीव मंडळाने तातडीने बुधवारी रात्री बैठक घेतली.

त्या बैठकीस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वनमंत्री विश्‍वजित राणे, वनविकास महामंडळाच्या दिव्या राणे, मुख्य सचिव व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Rajendra Kelkar
Mining in Goa - खाणकामाची सुरवात शाश्वत पद्धतीने करण्यासाठी योजना आखणार | Gomantak TV

सेव्ह गोवा सेव्ह म्हादईच्या झेंड्याखाली घाटे यांनी व्याघ्र प्रकल्प व्हावा, यासाठी ग्रामपंचायती, नगरपालिकांनी ठराव घ्यावेत आणि व्याघ्र प्रकल्पाला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, माजी सभापती आणि बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे वनमंत्री असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कारकिर्दीत व्याघ्र प्रकल्पाची गरज असल्याचे म्हटले होते, याची आठवण घाटे यांनी करून दिली.

सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत विश्‍वजित राणे यांनीच व्याघ्र प्रकल्प का नको, हा मुद्दा मांडला. त्यात म्हादई अभयारण्याशी लोकांचा संबंध येत नाही. तेथील घरांवर काही निर्बंध येतील, घरांचे पुनर्वसन करावे लागेल. त्यासाठी जमीन लागेल.शिवाय उद्योग येणार नाहीत, असेही सांगत व्याघ्र प्रकल्प का नको हे स्पष्ट केले.

Rajendra Kelkar
TMC Goa - मैनापी धबधबा पीडितांना नुकसान भरपाई द्या - टी एम सी | Gomantak TV

केरकर बोलतील या भीतीनेच...!

दोन-अडीच महिन्यांपूर्वीच मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. व्याघ्र प्रकल्पाचे पुरस्कर्ते राजेंद्र केरकर यांना मंडळावरून हटविण्यात आले. मंडळाची यापुढे बैठक झालीच तर तेच फक्त व्याघ्र प्रकल्पाची गरज आणि आवश्‍यकता याबाबत अभ्यासपूर्ण मत मांडतील, त्यावेळी त्याला विरोध करता येणार नाही, याच भीतीने त्यांना त्या मंडळावरून हटविण्यात आले असावे, असा संशयही राजन घाटे यांनी व्यक्त केला आहे.

काणकोणात आज जनजागृती

काणकोण येथील सात पंचायती व एका नगरपालिकेत जाऊन शुक्रवारी जनजागृती केली जाईल व म्हादई रक्षणार्थ ठराव मंजूर करण्याचे आवाहन केले जाईल. नंतर संध्याकाळी ४ वाजता काणकोणात सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विकास भगत यांनी दिली.

Rajendra Kelkar
Goa Burglary Case: गोव्यासह तीन राज्यांमध्ये घरफोड्या, 30 लाखांच्या मुद्देमालासहित चोरटा जेरबंद

व्याघ्र प्रकल्प हवाच : राजन घाटे

राज्य वन्य प्राणी मंडळाच्या बैठकीत व्याघ्र प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध करून सेव म्हादई, सेव्ह टायगर मंच तर्फे आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्याघ्र प्रकल्प हवाच, अशी मागणी पर्यावरणप्रेमी राजन घाटे यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेला मारीयानो फेर्रांव उपस्थित होते. आम्ही दक्षिण गोव्यातील सर्व पंचायतींना भेट देणार असून सरपंच, पंचांना म्हादई रक्षणार्थ ठराव घेण्याचे आवाहन करणार आहोत, असे प्रतिमा कुतिन्हो यांनी सांगितले. लोकांनी ‘आमकां कित्याक पडलां’ ही वृत्ती सोडावी, असेही कुतिन्हो म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com