Goa Burglary Case: गोव्यासह तीन राज्यांमध्ये घरफोड्या, 30 लाखांच्या मुद्देमालासहित चोरटा जेरबंद

सिंधुदुर्गात कारवाई
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime गोवा, महाराष्ट्रासह कर्नाटकात मिळून घरफोडीचे तब्बल 45 गुन्हे दाखल असलेल्या मूळ गोवा येथील आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील (वय 38 रा. घाटवाडा पडोसे, सत्तरी) याला सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाने वागदे (ता. कणकवली) येथे शिताफीने अटक केली.

त्याच्याकडून गावठी कट्टा, जीवंत राऊंड, काडतूस, तलवारी, रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट, सोन्या-चांदीचे दागिने, पैसे मोजण्याचे व सोने चांदी वितळविण्याचे इलेक्ट्रिक मशीन, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, ड्रील मशीन, एक दुचाकी, एक चारचाकी असा एकूण 30 लाख 48 हजार 784 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.

Goa Crime
Mhadai Tiger Reserve: केंद्राचा महत्वाचा प्रस्ताव राज्याने फेटाळला; सरकार म्हणतं, व्याघ्र प्रकल्पासाठी...

प्रकाश पाटील याला बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सापळा रचून पकडले. त्याच्याजवळ मिळालेल्या घातक वस्तू पाहून हा गुन्हेगार सराईत असल्याचे लक्षात आल्याने सिंधुदुर्ग पोलिसांनी नजीकच्या राज्यांत तसेच जिल्ह्यांमध्ये चौकशी केली. त्यानंतर त्याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

अन् जाळ्यात अलगद सापडला

उपनिरीक्षक रामचंद्र शेळके सहकाऱ्यांसोबत कणकवलीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला संशयित प्रकाश पाटील हा मोटारीतून (जीए 05, एफ 4601) प्रवास करताना दिसला. त्याला या पथकाने ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्याच्याकडे घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे सापडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com