

सासष्टी: मडगाव नगरपालिकेतील वादग्रस्त नोकर भरती प्रकरणाने परत एकदा तोंड वर काढले आहे. नोकर भरतीच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना निमंत्रण पाठवले नसल्याने अर्जदारांनी तक्रार केली होती. या तक्रारीत नोकर भरतीतील अनेक त्रुटींवर भर देण्यात आला होता. आता या तक्रारीबद्दल पालिकेने काय कारवाई केली, याबद्दल अहवाल द्यावा, असे निर्देश पालिका संचालकांनी मडगाव पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
अर्जदारांनी तक्रारीच्या प्रति मुख्य सचिव, नगर विकास सचिव व पालिका प्रशासन संचालनालयाला पाठविण्यात आल्या होत्या. निम्नस्तर लिपिक पदासाठी पालिकेने अर्ज मागवले होते. लेखी परीक्षा २३ व २४ ऑगस्ट रोजी झाल्या. पण परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांपैकी ५० टक्के अर्जदारांना परीक्षा देण्यापासून डावलण्यात आले.
कित्येकांना परीक्षेचा दिवस, वेळ वगैरे सांिगतली नाही. ही कृती जाणीवपूर्वक केल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले. स्वतंत्र एजन्सी मार्फत परीक्षा न घेता पालिकेतर्फेच परीक्षा घेण्यात आल्या. या नोकरभरती प्रक्रियेबद्दल गोवा कर्मचारी निवड आयोगाला सांगितले नाही. आरटीआयमधून स्पष्ट झाले की, परीक्षेला १३९८ अर्जदार पण आसन क्रमांक १७६७ पर्यंत दिले होते.
स्वतंत्र चौकशीची मागणी
तक्रारदारांनी ५ महत्वाच्या मागण्या पुढे केल्या. त्यात लेखी परीक्षा प्रक्रिया रद्द करणे. परीक्षा नव्याने घेणे, परीक्षेची सूचना अर्जदारांना इमेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअप संदेशाद्वारे देणे, कर्मचारी निवड आयोगातर्फे परीक्षा घेणे, प्रक्रियेतील चुकांची स्वतंत्र चौकशी करणे. उमेदवारांना झालेला खर्च देणे. या प्रकरणी मडगाव काँग्रेस ब्लॉकचे सावियो कुतिन्हो या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.