Govind Gaude : माशेल ही खेळाडू, कलाकारांची भूमी

मंत्री गावडे : तिवरे - वरगाव पंचायतीतर्फे कला महोत्सव उत्साहात
Govind Gaude
Govind GaudeGomantak Digital Team
Published on
Updated on

Govind Gaude: माशेल ही देवदैवतांची भूमी असून या भूमीत दिग्गज कलाकार घडले आहेत. या कलाकारांमुळे माशेलसह गोव्याचे नावही देशभर गाजले आहे.

कला, क्रीडा आणि संस्कृती जपण्याचे कार्य माशेलात सातत्याने होते, असे मत मंत्री गोविंद गावडे यांनी कला महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी व्यक्त केले.

देवकीकृष्ण मैदानावर नुकतेच आयोजित कला महोत्सवाच्या व्यासपीठावर जि. पं. सदस्य श्रमेश भोसले, दक्षिण गोवा पंचायत उपसंचालक प्रसिद्ध नाईक, सरपंच जयेश नाईक, उपसरपंच सुमित्रा नाईक, पंचायत सचिव मयूर कुडाळकर व पंच होते.

Govind Gaude
Goa Land Grab Case: पतीच्या निधनानंतर 'ती'ने दिला निकराचा लढा, बळकावलेली जमीन अखेर 10 वर्षानंतर मिळाली परत

तिवरे-वरगाव पंचायतीतर्फे स्वयंपूर्ण गोवा व आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत आयोजित केलेल्या कला महोत्सवाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. पंचायतीतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना मंत्री गावडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

सरपंच जयेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्नेहा नाईक यांनी केले तर आभार प्रदर्शन सुमित्रा नाईक यांनी केले.

Govind Gaude
Goa Tourist Rash Driving: गोव्यात काहीही केले तरी चालते? एन्जॉयच्या नावाखाली पर्यटक तरूणींचा 'रेंट अ कार'मधून धोकादायक प्रवास

नवोदितांना प्रोत्साहन द्या

श्रमेश भोसले म्हणाले, माशेल पंचक्रोशीत पारंपरिक कलेचा वारसा जपला जातो. या भूमीत बाराही महिने विविध कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमामुळे नव्या पिढीवर उत्तम संस्कार होतात. त्यातून नवे नवे कलाकार घडतात.

पंच सदस्यांनी आपल्या प्रभागातील महिला, मुले व इतर नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करावे, त्यांना प्रोत्साहन द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com