Solar Ferry Boat: पणजी-चोडण सौर फेरी बोटला अल्प प्रतिसाद; दिवसाकाठी केवळ 15 ते 20 प्रवासी घेतात बोटीचा लाभ

पणजी-चोडण मार्गावरील स्थिती : नदी परिवहनसमोर प्रश्‍न, मोफत असूनही सेवेला अल्प प्रतिसाद
Solar Ferry Boat between Panjim-Chorao:
Solar Ferry Boat between Panjim-Chorao:Dainik Gomantak
Published on
Updated on

Solar Ferry Boat between Panjim-Chorao: दी परिवहन खात्यातर्फे या महिन्यापासून सुरू झालेल्या पणजी ते चोडण या जलमार्गावर सौर ऊर्जेवरील फेरीबोट सेवेला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

दिवसाकाठी 15 ते 20 प्रवासीच या सेवेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता ही सेवा पूर्ववत किती दिवस सुरू ठेवायची कि खासगी चालकालाच भाडेपट्टीवर द्यायची, असा विचार सरकारी पातळीवर आता सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौर ऊर्जेवरील फेरीबोट सुरू झाल्याने प्रवासी आणि पर्यटक त्याचा लाभ घेतील, असे वाटत होते.

आता दोन आठवडे ओलांडून गेले तरी या सेवेला म्हणावा, तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच आत्तापासून नदी परिवहन खाते या बोटीचे करायचे काय? यावर विचार करू लागले आहे.

Solar Ferry Boat between Panjim-Chorao:
Panaji News : विंडो पेन ओयस्टरचे संरक्षण ही काळाची गरज : इंगोले

सौर ऊर्जेवरील फेरीबोट चालविण्यासाठी नदी परिवहन खात्याचे प्रशिक्षित वर्ग नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बनविलेली ही बोट काही महिने ज्या कंपनीने तिची बांधणी केली आहे, त्याच कंपनीच्या डॉकयॉर्डमध्ये ठेवावी लागली होती.

Solar Ferry Boat between Panjim-Chorao:
Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस चाचणी यशस्वी; सेवेला लवकरच प्रारंभ शक्य

अखेर मागील महिन्यात ही फेरीबोट भाड्याने दिली गेली. त्यात तीन कंपन्यांनी बोली लावली होती.

अखेर गौर कन्सल्टन्स म्हणून असलेल्या कंपनीला चालविण्यास ती बोट दिली. दोन महिन्यांत बोट चालविण्याबरोबरच नदी परिवहन खात्याचे कर्मचारी प्रशिक्षित करावयाची अटही त्यात होती.

Solar Ferry Boat between Panjim-Chorao:
Panaji News : सांताक्रुझमध्ये खोदाई; डांबरीकरणाकडे दुर्लक्ष

दिवसांतून पणजी ते चोडण अशा चार फेऱ्या होतात. सकाळी दोन आणि सायंकाळी दोन फेऱ्या ठेवण्यात आलेल्या असून, ही सेवा काही दिवस मोफत ठेवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. त्यानुसार ती सेवा मोफत ठेवली गेली.

परंतु दिवसाकाठी 15 ते 20 प्रवासीच ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com