अवकाळी पावसामुळे काजू, आंबा बागांचं नुकसान

हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल
loss to Cashew Plant due to untimely rain
loss to Cashew Plant due to untimely rainDainik Gomantak

पणजी : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त गोवेकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळालेला असला तरीही अचानक आलेल्या पावसाने काजू, आंबा, फणस यासारख्या पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे.

loss to Cashew Plant due to untimely rain
मडगावातून सांडपाण्यासोबत साळ नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक

अवकाळी पावसामुळे काजू (Cashews) आणि आंब्याचं पीक उशिराने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणा पावसासह वादळी वाऱ्याने मोहोर झडून गेल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. चांगला मोहोर येऊनही निसर्गाच्या लहरीपणामुळे फळधारणा नीट होत नसल्याचं चित्र गोव्यात दिसू लागलं आहे.

loss to Cashew Plant due to untimely rain
मडगावात पाईप फुटून हजारो लीटर पाण्याची नासाडी

सासष्टी (Salcete) आणि मुरगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे काजू, आंबा बागायतींचं मोठं नुकसान झालं आहे. गोव्यात मार्चमध्ये तब्बल 37 अंशांपर्यंत तापमान पाहायला मिळालं होतं. तर फेब्रुवारीमध्ये हेच तापमान जवळपास 35 अंश होतं. हंगामी पिकांसाठी पोषक वातावरण असूनही केवळ अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. कोरोनाचे (Corona) निर्बंध आता कुठे हटवले जात असतानाच नव्या संकटामुळे शेतकरीही हतबल झाल्याचं चित्र आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com