Madgaon Water Pipeline Burst
Madgaon Water Pipeline BurstDainik Gomantak

मडगावात पाईप फुटून हजारो लीटर पाण्याची नासाडी

राज्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विभागाचं पाणीगळतीकडे दुर्लक्ष
Published on

मडगाव : मडगाव पॉवरहाऊस जवळ आज नव्या पाईपलाइनला जोडणी देण्याचे काम चालू असताना पाण्याचा पाईप फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. सध्या उन्हाळ्यात दक्षिण गोव्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले.

Madgaon Water Pipeline Burst
गोव्यात पाणीप्रश्न पेटलेलाच, बाणावलीत मात्र पाण्याची नासाडी

मडगावमध्ये (Madgaon) स्टेशन रोड परिसरात टाकलेल्या नवीन वाहिनीला नियमित वाहिनीची जोडणी देण्यासाठी हे काम हातात घेतले होते. पण हे काम सुरू करण्यापूर्वी पाण्याचा प्रवाह बंद करण्याचे भान पाणी खात्याने ठेवल्याने ही नासाडी झाली. पाईप फुटल्याने सगळीकडे पाण्याचे (Water) फवारे उडत असलेले चित्र दिसत होते.

Madgaon Water Pipeline Burst
फोंड्यात अग्नितांडव, घराला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान

या संबंधी पाणी खात्याचे कनिष्ठ अभियंते कृष्णा नाईक यांना विचारले असता, पाण्याच्या दाबाने हा पाईप फुटला नसून दुसऱ्या वाहिनीला जोडणी देण्यासाठी पाईप कापला जात असताना हा प्रकार घडला. हे काम सुरू करण्यापूर्वी पाणी प्रवाह (Water Supply) बंद केला होता. मात्र पाईपमध्ये जे पाणी होते ते वाहू लागले. ही जलवाहिनी उंचवट्यावरून खाली येत असल्याने पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने हे फवारे उडले असा खुलासा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com