Panjim : मार्केटमधील गाळेधारकांचा भाडेकरार रखडल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान

मालकांची मात्र चांदी : महापालिकेची कराराची फाईल मंत्रालयातच!
Panjim Municipal Market (Goa)
Panjim Municipal Market (Goa)Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji : पणजी महानगरपालिकेच्या मालकीच्या मार्केट इमारतीतील दुकानगाळेधारकांशी भाडेकराराला विलंब होत चालला आहे. आता होणार, मग होणार, असेच महानगरपालिका बाजार समिती असली तरी करार न होण्यासाठी झारीतील शुक्राचार्य वावरत असल्याची चर्चा ही अनेक वर्षांपासून कायम आहे. करार लांबणीवर पडत असल्याने महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असले तरी भाड्याने गाळे देणाऱ्यांची मात्र चांदी आहे.

दरवर्षीप्रमाणे गाळे भाड्याने देणाऱ्या मालकांनी भाडेपट्टी वाढीचा आपला करारानुसारचा नियम अमलात आणणे चालू ठेवले आहे. त्यामुळे आता चार आकडी भाडेकरार घेणारे गाळा मालक आता पाच आकडी संख्या असलेली रक्कम भाड्यापोटी घेऊ लागला आहे. महानगरपालिकेचे बाजार समितीचे तत्कालीन अध्यक्ष राहिलेल्या शेखर डेगवेकर यांनी तत्कालीन महापौर उदय मडकईकर यांच्या साथीने भाडेकरार होण्यासाठी कार्यवाही पार पाडली होती. काही महिन्यांत करार होणार, असे वाटत होते, परंतु त्याला आडकाठी आली.

Panjim Municipal Market (Goa)
Panaji News : पाऊले चालती वाचनालयाची वाट

काही ना काही कारणे काढत हा करार कसा लांबणीवर जाईल, हे पाहिले. तोपर्यंत महानगरपालिका निवडणूक लागताच मार्केटमधील विक्रेत्यांनी डेगवकर यांना धडा शिकविला आणि नगरसेवकपदावरून खाली खेचले. नव्याने सत्तेवर आलेल्या नगरसेवक मंडळातून बाजार समितीचे चेअरमनपद प्रमेय माईणकर यांच्या गळ्यात गेले, त्यांनाही भाडेकराराची फाईल रेटता आली नाही. आता हे पद सांभाळणारे बेंटो लॉरीन हे करार मंजुरीसाठी गेलेली फाईल पालिका प्रशासनातून केव्हा मंजूर होऊन येईल याची वाट पाहत आहेत.

Panjim Municipal Market (Goa)
Panaji : पहिल्याच पावसाने मिरामार सर्कल जलमय, स्मार्ट सिटीच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित

महापौर रोहित मोन्सेरात यांनी खरेतर अशा कामांचा पाठपुरावा करून घेणे आवश्‍यक आहे. परंतु ते हे काम करतील असे वाटत नाही. खरेतर बेंटो लॉरीन यांना पुढाकार घेऊन ही फाईल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या सहकार्याने मंजूर करणे अवघड नाही. साधारण 540 दुकान गाळ्यांचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भाड्याच्या रकमेनुसार रक्कम पकडली तर काही लाखांत ही रक्कम पोहोचते आणि वर्षाकाठी त्यातून कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकतो, असे दिसते.

Panjim Municipal Market (Goa)
Panaji : लोहिया मैदानावर जाहीर सभा; म्हादईप्रश्नी सरकार गंभीर नाही - निर्मला सावंत

महानगरपालिकेला मार्केटमधील भाडेकराराचे काही पडलेले दिसत नाही. आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या होकारामुळे आम्ही भाडेकरार करण्याविषयी हात घातला होता. भाडेकरार झाला असता तर महानगरपालिकेला कोट्यवधीचा वर्षाकाठी महसूल मिळाला असता. या रकमेतून अनेक विकासकामे महानगरपालिकेला राबविता आली असती, पण ते झाले नाही. अजूनही माशी कुठे शिंकतेय हे बाजार समितीने पाहायला हवे.

- शेखर डेगवेकर, माजी चेअरमन, बाजार समिती.

Panjim Municipal Market (Goa)
Kolhapur-Panaji Bus Accident: कोल्हापूर-पणजी खासगी बसला अपघात; प्रवासी झोपेत असताना अचानक...

मार्केटमधील भाडेकराराविषयाचा सतत महानगरपालिकेच्या बैठकीत आम्ही विषय आणत असतो. परंतु हा करार व्हावा, असे मनात वाटावे तरच तो सत्यात येईल. आमदार मोन्सेरात यांच्या मदतीने आम्ही सर्वजणांनी त्यावेळी पाठपुरावा केल्यामुळे मार्केटची जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आली. पण भाडेकरार होणे महानगरपालिकेसाठी महत्त्वाचे आहे, दोन वर्षे झाली तरी नव्या सदस्यांना त्याची अंमलबजावणी करता आलेली नाही.

- उदय मडकईकर, माजी महापौर तथा नगरसेवक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com