Panaji News : पाऊले चालती वाचनालयाची वाट

गावांतही आवड : पणजी मध्यवर्ती वाचनालयात येतात दरमहा 12 हजार वाचक
Library
Librarygomantak digital team
Published on
Updated on

पणजी : वाचनसंस्कृतीत वाढ व्हावी, यासाठी सरकारद्वारे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात अनुदानित वाचनालये चालविली जातात. जिल्हा, तालुका, नगर स्तरावरही वाचनालयांची स्थापना करण्यात आली आहे. लाखो वाचकांना संचित असलेले ‘अक्षय ज्ञान’ या पुस्तकांद्वारे मिळत असते. कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सर्वच वाचनालये बंद होती. परंतु आता कोरोनानंतर पुन्हा अनेक चोखंदळ वाचकांची पावले वाचनालयांकडे वळत आहेत.

कृष्णदास श्‍यामा मध्यवर्ती वाचनालयाला दर महिन्याला सुमारे १२ हजार वाचक भेट देतात. त्यासोबतच १२ हजारांहून अधिक वाचक घरी वाचण्यासाठी पुस्तके घेऊन जातात, अशी माहिती वाचनालयाचे ग्रंथपाल डॉ. सुशांत तांडेल यांनी दिली. त्यासोबतच शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, संशोधनांसाठी येणारे विद्यार्थी, अभ्यासक, लेखक आणि वाचक मोठ्या प्रमाणात वाचनालयातील ग्रंथांच्या आधारे अभ्यास, संशोधन पूर्ण करतात.

Library
Panaji News : काकरा येथील होड्या जळितग्रस्तांना योग्य तीच भरपाई दिली - नीळकंठ हळर्णकर

विद्यार्थ्यांचा वाढतोय सहभाग

उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आता पुन्हा शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये गजबजू लागली आहेत. शाळांमधून शिकवणीला सुरवात झाल्याने विषयांच्या अनुषंगाने लागणारी पुस्तके तसेच इतर वाचनासाठी विद्यार्थ्यांची पावले वाचनालयाकडे वळू लागली आहेत. प्रामुख्याने दुपारनंतर विद्यार्थी वाचनालयाला भेट देतात.

Library
Panji Traffic Issue: खंडपीठाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वेच्छा दखल

राज्यभरात १४५ वाचनालये

बिगर सरकारी संघटनांद्वारे राज्यात १४५ वाचनालये चालविली जातात. या वाचनालयांमध्येही मोठ्या प्रमाणात वाचक येत असतात. दररोजची वृत्तपत्रे, मासिके, प्रामुख्याने येथे वाचली जातात तसेच विविध विषयांवरील पुस्तके, ललित साहित्य घरी वाचण्यासाठी नेले जाते. त्यामुळे ग्रामीण वाचनालये देखील वाचन संस्कृतीच्या अनुषंगाने महत्त्वाची ठरली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com