Goa Politics: जनतेच्‍या पैशांची लूट हा घरचा विषय नव्हे: विजय सरदेसाई

Goa Politics: तानावडे यांचे हे वक्‍तव्‍य ही चिंता करण्‍याची बाब आहे, असे सरदेसाई यांनी आपल्या ट्‍वीटमध्‍ये म्‍हटले आहे.
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

Goa Politics: सभापती रमेश तवडकर आणि कला व संस्‍कृती मंत्री गोविंद गावडे यांच्‍यात सध्‍या चालू असलेला संघर्ष म्‍हणजे त्‍या घरच्‍या गोष्‍टी असे म्‍हणत भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष सदानंद तानावडे यांनी या प्रकरणावर पांघरून टाकण्‍याचा प्रयत्‍न केला.

मात्र गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी जनतेच्‍या पैशांची लूट हा भाजप पक्षाचा घरचा विषय होऊ शकत नाही. तानावडे यांचे हे वक्‍तव्‍य ही चिंता करण्‍याची बाब आहे, असे सरदेसाई यांनी आपल्या ट्‍वीटमध्‍ये म्‍हटले आहे.

काँग्रेस, गोवा फॉरवर्डकडूनही जोरदार हरकत

हा अंतर्गत विषय आहे, असे नमूद करून विषय गुंडाळण्याच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कृतीला कॉंग्रेस व गोवा फॉरवर्डने जोरदार हरकत घेतली आहे.- कॉंग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी अंतर्गत बाब म्हणून सरकार कला अकादमी नूतनीकरण घोटाळ्याची फाईल बंद करेल का, अशी खोचक विचारणाही केली आहे. डबल इंजिन सरकार भ्रष्टाचाराची प्रकरणे झाकण्यात माहीर आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Vijay Sardesai
Govind Gaude: गावडेंच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम

हा अंतर्गत विषय : तानावडे

तानावडे यांनी हा भाजपचा अंतर्गत विषय असल्याचे आज पत्रकार परिषदेत नमूद केले. तवडकर यांनी जाहीरपणे असे वक्तव्य करायला नको होते, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की,

मुख्यमंत्री आणि मी त्या दोघांशी बोलणार आहोत. हा तसा मोठा विषय नाही. विरोधकांकडे अन्य मुद्देच नसल्याने ते या विषयाचे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आदिवासी समाज ताकद दाखवणार

हा वाद का उफाळला, याची कारणमीमांसा आदिवासी समाजाच्या नेत्यांकडूनही केली जात आहे. राजकीय आरक्षणासाठी समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. विधानसभेवर मोर्चा नेण्याचे नियोजन असताना समाजाच्या दोन नेत्यांमधील वाद वाढू नयेत,

Vijay Sardesai
Goa Tourism: गोव्यात सगळे महाग, त्यामुळे पर्यटक विदेशात

यासाठी या दोन्ही नेत्यांपर्यंत योग्य तो संदेश पोचवण्यात आला आहे. हे नेते हट्टाला पेटले तर त्यांना विधानसभा निवडणुकीत समाजाची ताकद दाखवून देऊ, असेही समाजाचे नेते आता बोलू लागले आहेत.

सार्वजनिक निधीचा गैरवापर आणि विभागातील घोटाळे हा कळीचा मुद्दा आहे. हा गोवा आणि गोमंतकीय यांचा प्रश्न आहे. सभापतींच्या गंभीर आरोपांचा अर्थ ‘पक्षीय मुद्दा’ असा लावणे, हा केवळ त्या घटनात्मक पदाचा अपमानच नाही, तर भ्रष्टाचार सर्वमान्य करण्याचा प्रयत्न आहे.

- विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com