Goa Tourism: गोव्यात सगळे महाग, त्यामुळे पर्यटक विदेशात

Goa Tourism: गुदिन्हो : सिंधुदुर्गही करणार राज्याशी स्पर्धा
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: राज्यात यंदाच्या पर्यटन हंगामात कमी प्रमाणात पर्यटक आलेे आहेत. गोव्यात सगळेच महाग आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. पर्यटक आता विदेशात कमी पैशांत जाणे पसंत करत आहेत.

हॉटेल, पर्यटनाशी संबंधित आणि विमानसेवा या सर्वांना मी तुमच्या दरवाढीचा पर्यटनावर अनिष्ट परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिलेेले आहे. शेजारच्या सिंधुदुर्गमध्येही पर्यटन नावारूपाला येत असून भविष्यात

ते गोव्याशी स्पर्धा करू शकतात, असे वक्तव्य वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. मोपा विमानतळावर ‘ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी काउंटर’चे उदघाटन केल्यानंतर माविन बोलत होते.

यावेळी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, चांदेल-हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस, तांबोसे, मोपा-उगवेचे सरपंच सुबोध महाले, कासारवर्णेच्या सरपंच अवनी गाड, पेडणेच्या उपनगराध्यक्ष अश्विनी पालयेकर,

Goa Tourism
Betul Beach: या कारणासाठी आहे बेतुल बीच लोकप्रिय; जाणून घ्या काय आहे खास..

ब्लू कॅब टॅक्सी संघटनेचे निमंत्रक भास्कर नारुलकर, अध्यक्ष संजय कांबळी, पेडणे वाहतूक कार्यालयाचे अधिकारी कमलाकर कारापूरकर, तुकाराम हरमलकर, सूर्यकांत तोरसकर, आत्माराम तोरसकर, उदय महाले

उपस्थित होते.

दरम्यान, आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, हा टॅक्सी काऊंटर होण्यासाठी जरा वेळ लागला. आमदार या नात्याने मी नेहमीच लोकांसोबत असेन. भास्कर नारुलकर म्हणाले की, या काऊंटरच्या मागणीसाठी आंदोलन काळात ग्रीन फिल्ड टॅक्सी असोसिएशन, मोपा विमानतळ लोकल टॅक्सी असोसिएशन आदींचा मोठा पाठिंबा मिळाला.

रोजगार प्रस्तावाला मिळाली मान्यता

स्थानिकांना रोजगाराची संधी मिळालीच पाहिजे म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडला असून त्यांनी त्याला मान्यता दिली आहे. आमदार प्रवीण आर्लेकर हे माझ्याकडे आले आणि पोटतिडकीने मागण्या मांडल्या. पण टॅक्सी काऊंटरची प्रक्रिया लगेच होत नसते, म्हणून तिला काही वेळ लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com