गोव्यात पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत 98254 मुलांना मिळाले 'दो बूंद जिंदगी की'

काणकोण तालुक्यातील काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे 25 केंद्रावर 3042 मुलांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले.
Polio Vaccination
Polio VaccinationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत गोव्यात रविवारी पाच वर्षांखालील मुलांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील 98254 मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला.

Polio Vaccination
'जलआयोग, वन विभागाने वैधानिक मंजुरी नाकारावी'

काणकोण (Canacona) तालुक्यातील काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे 25 केंद्रावर 3042 मुलांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. या मोहिमेत काणकोण आरोग्य केंद्राच्या परिचारिका तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओ डोस देण्यात आला. या वयोगटात काणकोण तालुक्यामध्ये 3142 मुले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण (Vaccination) मोहिमेत 96.81 टक्के बालक- बालिकांना पोलिओ डोस पाजण्यास आरोग्य केंद्राला यश आले. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. स्नेहा आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, काणकोण लायन्स क्लबचे पदाधिकारी त्याबरोबरच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Polio Vaccination
मतदारांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला; गिरीश चोडणकर

पोलिओ मोहिमेला शिवोली पंचक्रोशीत चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी दिवसभरात चाललेल्या या मोहिमेत सुमारे दोन हजार बालकांनी डोस घेतल्याची माहिती शिवोली (Siolim) आरोग्य केंद्राच्या मुख्याधिकारी डॉ. साधना शेट्ये यांनी दिली. पोलिओ मोहिमेनंतर शिवोली मतदारसंघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात निर्माणाधिन असलेल्या बांधकामावर जाऊन आरोग्य केंद्राचे पथक पाच वर्षाखालील मुलांना पल्स पोलिओचा डोस पाजणार असल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

दरम्यान, नियमित पल्स पोलिओ घेणाऱ्यांनीही या विशेष मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मोहिमेत आरोग्य केद्राच्या कर्मचाऱ्यांबरोबरच स्थानिक अंगणवाडी केंद्रातील कर्मचारी या मोहिमेत सकाळपासून सहभागी झाल्याने या मोहिमेत सुसूत्रता आल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले. कांदोळी आरोग्य केंद्रात 3011 इतक्या बालकांनी डोस घेतल्याची माहिती या केद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com