Loksabha Election 2024 : काँग्रेस आक्रमक; खलपांचे श्रीपादना आव्हान

Loksabha Election 2024 : भाजपने लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा दुसरा गियर टाकला आहे. मुख्यमंत्र्यांनी उत्तर व दक्षिण गोव्यातील पंच व नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी दोन बैठका घेतल्या.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

पणजी, आपली १८ महिन्यांची खासदारकीची कारकीर्द आणि नाईक यांची २५ वर्षांची कारकीर्द यावर त्यांच्याशी जाहीरपणे चर्चा करण्यास आपण तयार आहे, आपले हे आव्हान नाईक यांनी स्वीकारावे असे खलप यांनी दै. ‘गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले.

नाईक यांना या आव्हानाबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याआधी विकासाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चर्चेचे निमंत्रण दिले होते. ते आधी गांधी यांना स्वीकारू द्या नंतर मी चर्चेचे आव्हान स्वीकारण्याचा विचार करतो.

काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना घरगुती विषय समजणार नाही अशी आक्रमक टीका केली होती त्याला धेंपे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरियातो यांचे आरोप फेटाळून लावले होते. एक महिला म्हणून आपला तो अपमान असल्याचे धेंपे यांनी सुचित केले होते.

भाजपने लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा दुसरा गियर टाकला आहे. मुख्यमंत्र्यांनी उत्तर व दक्षिण गोव्यातील पंच व नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी दोन बैठका घेतल्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उत्तर गोव्यातील एका आणि दक्षिण गोव्यातील एका विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी २० मतदान केंद्र पातळीवरील मतदार यादी पान प्रमुखांची (पन्ना प्रमुख) यांच्या संमेलनांना संबोधित करणे सुरू केले आहे. समाज माध्यमे, महिला मोर्चा, किसान मोर्चा, आदिवासी मोर्चा आदींनीही प्रचार आपापल्या पातळीवर सुरू केला आहे.

श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यातील प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्यावर आज सोमवारी अर्धा दिवस विश्रांती घेतली. दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी कार्यकर्ता बैठकीची एक फेरी पूर्ण केल्यावर दोन दिवसांत विविध समाजाच्या नेत्यांशी संवाद साधण्‍यावर भर दिला आहे.

भाजप आम मगोचे मिळून उत्तर गोव्यात १८ आमदार आहेत. त्या त्या स्थानिक आमदारांवर भाजपने स्थानिक प्रचाराची जबाबदारी दिली होती. प्रचार प्रमुख म्हणून पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि त्यांना मदत म्हणून आमदार केदार नाईक अशी रचना भाजपने केली आहे.

उत्तरेतील प्रचार दौऱ्यात मांद्रेतील मगोचे आमदार जीत आरोलकर यांनीही नाईक यांना मोठे मताधिक्य देणार असल्याचे जाहीरपणे नमूद केले आहे. दक्षिण गोव्यात भाजपला दोन अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.

Loksabha Election 2024
South Goa Constituency : दक्षिणेतील वीसही मतदारसंघात भेटीगाठी : दिगंबर कामत

कुडतरीचे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि कुठ्ठाळीचे आंतोन वाझ यांनी आपापल्या समर्थकांचे मेळावे घेऊन भाजपचे काम थोडे सोपे केले आहे.

भाजपने २० एप्रिलपासून जाहीर सभेचे नियोजन केले असून त्याआधी उत्तर व दक्षिण गोव्यात प्रचाराच्या दोन्ही फेऱ्या पूर्ण करण्याचे ठरवले आहे. भाजपच्या मदतीला संघ परिवारातील विविध संघटनांचे कार्यकर्ते आले असून त्यांनी घरोघरी जात मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणे सुरू केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com