Loksabha Election 2024 : मडकईतून ९० टक्के मतदानासाठी प्रयत्न भर! सुदिन ढवळीकर

Loksabha Election 2024 : ढवळी येथील कापसान भागात झालेल्या जाहीर प्रचार सभेवेळी ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

फोंडा, भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मडकई मतदारसंघातून किमान ९० टक्के मतदान होईल याकडे मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांचा कटाक्ष राहील, असे मगो पक्षाचे नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

तसेच काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन वेरियातो फर्नांडिस यांच्या संविधानाविरुद्धच्या वक्तव्याचा मगो पक्ष निषेध व्यक्त करीत असल्याचेही ढवळीकर यांनी सांगितले. ढवळी येथील कापसान भागात झालेल्या जाहीर प्रचार सभेवेळी ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

विरियातो फर्नांडिस यांचा निषेध...!

काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी गोव्यावर भारतीय संविधान लादल्याचे स्पष्टपणे म्हटले असून त्या विधानाचा मगो पक्षासह आपण निषेध करीत असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. गोवा मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणार्पण केले, त्यांना वंदन न करणाऱ्या अशा लोकांबद्दल काय बोलावे?

या लोकांना स्वातंत्र्यसैनिकांचे नव्हेत तर आपल्याच काही माणसांचे पुतळे उभारायचे होते, पण तसे झाले नाही. वेरियातो फर्नांडिस यांनी नौदलात सेवा केली आहे, मात्र त्यांच्या विधानातून आपला भारत देश आणि संविधानाबद्दल अजिबात प्रेम नाही हेच त्यातून प्रतीत होते, असे ढवळीकर म्हणाले.

Loksabha Election 2024
Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण करणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

मडकईतील रस्ते १५ मेपर्यंत हॉटमिक्स!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पूर्ण पाठिंबा या कामाला असून आतापर्यंत काही ठिकाणी हे काम पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी सुरू आहे. सगळीकडे एलटी आणि एसटी वाहिन्या भूमिगत करण्यासाठी हे काम चालले आहे.

विशेषतः मडकईवासीयांना या कामाचा थोडा त्रास झाला, रस्त्यांची खोदाई झाल्यामुळे अचडणी आल्या पण आता हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून येत्या १५ मेपर्यंत मडकईतील सर्व रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येतील, अशी ग्वाही सुदिन ढवळीकर यांनी यावेळी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com