Mumbai Goa Highway | NCP Sharad Pawar
Mumbai Goa Highway | NCP Sharad PawarDainik Gomantak

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण करणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

Mumbai Goa Highway: पवारांच्या राष्ट्रवादीचा आगामी लोकसभेसाठी शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, यात मुंबई - गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway

गेल्या बारा वर्षापासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार अशी अपेक्षा बाळगून असलेल्या कोकणवासीयांसाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने तो जलद गतीने पूर्ण करतील असे आश्वासन दिले आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीचा आगामी लोकसभेसाठी शपथनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, यात मुंबई - गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) च्या शपथनामामध्ये मोदी सरकारच्या दहा वर्षात मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या काळात महागाई, तीव्र बेरोजगारी, शेतकऱ्यांची दुरावस्था, भ्रष्टाचार, खासगीकरण, नोटबंदी, सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या या शपथनाम्यात स्वयंपाकाच्या गॅसची किंमत ५०० रुपये करणार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवणार, दर पाच वर्षांनी जातनिहाय जनगणना करणार, अशी आश्वासने देण्यात आली आहेत.

Mumbai Goa Highway | NCP Sharad Pawar
Margao Goa News: दोन दिवस वडील दार ठोठावत होते; गोव्यात बंद खोलीत आढळले सख्ख्या भावांचे मृतदेह, उपासमारीमुळे बळी?

यासह यामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार, नागारी भागाला अनुकूल ठरणारी जीएसटीची फेररचना करणार, कांदा दरात स्थिरता आणण्यासाठी आयात-निर्यात धोरण आखणार, तसेच, मुंबई - गोवा महामार्ग जलद गतीने पूर्ण करणार असे आश्वासन देण्यात आले आहे.

याशिवाय केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेद्वारे मांडणार, असेही या शपथपत्रात म्हटले आहे.

देशपातळीवर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार, असे या शपथपत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com