Unseasonal Rain In Goa
Unseasonal Rain In GoaDainik Gomantak

Unseasonal Rain In Goa: नभं उतरु आलं...! गोव्याला अवकाळीने झोडपले, पणजीत पाणी साचले, वीज पुरवठा खंडित

Unseasonal Rain In Goa: राजधानी पणजीच्या विविध भागात पावसाचे पाणी साचले, तर काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला.

Unseasonal Rain In Goa

गोव्यात शनिवारी (दि.२०) सकाळपासूनच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. दोन्ही जिल्ह्यातील विविध तालुक्यांना अवकानी झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

राजधानी पणजीच्या विविध भागात पावसाचे पाणी साचले, तर काही भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला.

Panaji Roads Under Water
Panaji Roads Under WaterDainik Gomantak

राजधानी पणजीत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने स्मार्ट सिटीतील रस्ते पाण्याखाली आले. शहरातील मध्यवर्ती भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती. तर, नागरिकांची तारांबळ उडाली.

Unseasonal Rain In Goa
Goa Loksabha Election Candidate : लोकसभेसाठी एकूण २० उमेदवार रिंगणात
Unseasonal Rain
Unseasonal RainDainik Gomantak

अवकाळीच्या हजेरीमुळे नागरिकांनी दैनंदिन कामं लांबणीवर टाकावी लागली. मागील सहा महिन्यांपासून विश्रांती दिलेली छत्री घेऊन काहीजण महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना दिसले.

गोवा वेधशाळेने शुक्रवारी राज्यात यलो अलर्ट जारी केला होता. राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता वेधशाळेने वर्तवली होती.

Unseasonal Rain
Unseasonal RainDainik Gomantak

शुक्रवारपासूनच राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते. गरमीने बेहाल झालेल्या नागरिकांनी शनिवारी सकाळी आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com