Loksabha Election : दोन्ही जिल्ह्यांत त्रिशंकू लढतीचे चित्र; लोकसभा निवडणुकीची रंगत वाढणार

Loksabha Election : मुरगाव तालुक्यात काँग्रेसची कसोटी लागणार असेच वारे सध्या वाहत आहे. मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार असून चौथा अपक्ष आमदार आहे व अपक्ष आमदाराचा पाठिंबा भाजपला आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Dainik Gomantak

Loksabha Election :

वास्को, अखेर काँग्रेसकडून आगामी लोकसभेसाठी गोव्यातील उमेदवारांची घोषणा झाल्याने उमेदवारीचा तिढा सुटला. त्यानुसार आता गोव्यातील लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून उत्तर आणि दाक्षिण गोवा मतदारसंघात भाजप, कॉंग्रेस आणि ‘आरजी’ अशी त्रिशंकू लढत होणार आहे.

उत्तरेत श्रीपाद नाईक (भाजप) विरुद्ध रमाकांत खलप (काँग्रेस) आणि मनोज परब (आरजी), तर द‌क्षिणेत पल्लवी धेंपे (भाजप) विरुद्ध कॅप्टन विरियातो फर्नांडिस (काँग्रेस) आणि रुबर्ट परेरा (आरजी) अशी त्रिशंकू लढत होणार आहे.

दक्षिण गोव्यातून भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे तसेच ‘आरजी’चे रुबर्ट परेरा यांचा प्रचार जोमात सुरू आहे. त्यांची प्रत्येक मतदारसंघात एक फेरी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, तर काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते प्रचाराचा नारळ कधी फोडणार, हे आता समजणार आहे.

मुरगाव तालुक्यात काँग्रेसची कसोटी लागणार असेच वारे सध्या वाहत आहे. मुरगाव तालुक्यातील चार मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांत भाजपचे आमदार असून चौथा अपक्ष आमदार आहे व अपक्ष आमदाराचा पाठिंबा भाजपला आहे. जरी काँग्रेसने आपला उमेदवार उशिरा जाहीर केला असला तरी काँग्रेसने आपले जोरदार प्रयत्न चालू ठेवले होते.

Loksabha Election 2024
Fishing In Goa: गोव्यात कर्नाटक, महाराष्ट्रातील बोटींचा शिरकाव; पारंपरिक मच्छीमारांना मासळीचा तुटवडा

दरम्यान, २०२२च्या विधानसभा निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील दोन मतदारसंघांतून भाजप उमेद‌वार तर एका मतदारसंघातून काँग्रेस आणि एका मतदारसंघातून अपक्ष उमेद‌वार विजयी झाला. यात मुरगाव मतदारसंघातून संकल्प आमोणकर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.

मुरगाव पालिका क्षेत्रात असून मुरगाव पालिकेमध्ये आमदार संकल्प आमोणकर यांचे दोन समर्थक होते. परंतु आमोणकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर नगरसेविका योगीता पार्सेकर यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले.

संकल्प आमोणकरांमुळे भाजपचे बळ वाढले

मुरगाव मतदारसंघात ११,००८ पुरुष व १०,४३८ महिला मतदार मिळून २१,४४६ मतदार आहेत. मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघांपैकी मुरगाव मतदारसंघ हा सर्वात लहान मतदारसंघ आहे. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी भाजपचे मिलिंद नाईक यांना पराभूत केले होते.

काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांना ९,०६७ मते प्राप्त झाली होती. तर भाजपचे मिलिंद नाईक यांना ७,१२६ मते प्राप्त झाली होती. जवळ-जवळ १,९५१ मताधिक्याने काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमोणकर विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे बळ वाढले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com